16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeसाहित्य*हिंदूंशी संवाद ठेवला तरच दलितांचे प्रश्न सुटतील :शरणकुमार लिंबाळे*

*हिंदूंशी संवाद ठेवला तरच दलितांचे प्रश्न सुटतील :शरणकुमार लिंबाळे*



…………………………
सनातन ‘ कार शरणकुमार लिंबाळे यांचे परखड मत

लातूर :
कोणताही एक धर्म स्वतःच्या विचारप्रणालीने देशावर राज्य करु शकणार नाही. त्यामुळे दलितांनी एककल्ली विचारांची कास सोडून हिंदूंशी संवाद ठेवला तरच दलितप्रश्नांची सोडवणूक होऊ शकेल, असे परखड मत ‘ सनातन ‘ कार व के.के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान ‘हा देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेले साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी येथे व्यक्त केले.
देशातील नामवंत दलित साहित्यिक व लातूरशी दीर्घकाळ ॠणानुबंध असलेले शरणकुमार लिंबाळे ‘ सरस्वती सन्मान’ मिळाल्यानंतर प्रथमच काही खाजगी कामानिमित्त लातूर दौर्यावर आले होते. हे औचित्य साधून ‘ माध्यम ‘ या सामाजिक व सांस्कृतिक विचारपीठाच्या वतीने येथील हाॅटेल राजधानी वर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
‘ माध्यम ‘ चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, सल्लागार डाॅ. सोमनाथ रोडे, ईश्वरचंद्र बाहेती, पुरुषोत्तम अनिल पुरी, प्रा. अभिनंदन जंगमे , प्रवीण सोमठाणेकर आदींची यावेळी उपस्थिती होती. लिंबाळे यांनी यावेळी लातूरशी संबंधित आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या ‘ सनातन ‘ या कादंबरीला देशभरातील 22 भाषांमधील गेल्या दशकातील एकमेव सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून ‘ ‘सरस्वती सन्मान ‘ हा रु. 15 लाखांचा मानाचा पुरस्कार मिळाला असून, जगातील अनेक भाषांमध्ये झालेला ‘ सनातन ‘ चा अनुवादही गाजत असल्याचे लिंबाळे सत्कारास उत्तर देताना म्हणाले. दलित लेखक व कार्यकर्ते यांच्याबरोबरच दलित चळवळीलाही संपविण्याचे काम आक्रमक आंबेडकरवाद्यांनी केले असल्याची खंत शरणकुमार लिंबाळे यांनी शेवटी व्यक्त केली. ‘ माध्यम ‘ च्या आगामी व्याख्यानाचे निमंत्रणही त्यांनी स्वीकारले.
………………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]