नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात होम हवन संपन्न
चाकूर : चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील नवसाला पावणाऱ्या श्री जनमाता आई देवस्थान मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात होणारे होम हवन मंगळवारी (दि.४) विविध यजमानांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाले. यावेळी होम हवनाची मुख्य आहुती मानकरी अमर साहेबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.
निसर्गरम्य परिसरातील जनमाता देवी मंदिरात अनिल जोशी व विवेक शास्त्री या पुरोहितांच्या मंत्रोच्चारामध्ये होम हवन संपन्न झाले. यावेळी यजमान म्हणून सौ.कल्पना बन्सीलाल कदम, सौ.महादेवी अशोक हिप्पाळे, सौ.राजश्री विश्वनाथ वाडकर, सौ.शामल भास्कर पाटील, सौ.मनीषा प्रदीप गुरमे, सौ.मयुरी सिद्धेश्वर चामले, सौ.सरला विजयकुमार भोसले, सौ.मंजुषा अमर पाटील, सौ.अलका पांडुरंग शिंदे, सौ.मीरा धनंजय शिंदे, सौ.मनिषा महेश चेऊलवार हे उपस्थित होते.
यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव ज्ञानोबा जाधव, आबा महाराज गिरी, सिने अभिनेत्री वैष्णवी जाधव पाटील, भानुदास नरहरे, चंद्रकांत साळुंके, माजी उपसरपंच बब्रुवान भोसले, हावगीराज जनगावे, महाराजा प्रतिष्ठान चे प्रमुख जगदीश भोसले, अनिल रेड्डी, आंबदास बिडवे, विकास पाटील, विनोद पाटील, जब्बार सय्यद, अजमेर शेख, मंजूर सय्यद, तुकाराम बने, धोंडीराम जवणे , गंगासागर बिडवे, संजीवना बिडवे, शांताबाई कांबळे, अनिता बुकतार यांच्यासह भाविक भक्त, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.