धार्मिक रत्न … पुरस्काराने
श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर
सन्मानित,
……………………………………..
पंढरपूर, ( वृत्तसेवा ):- शिरोरे प्रतिष्ठान कामखेडा नाशिक यांच्या वतीने श्रीनाथ संस्थानचे सद्गुरु तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या धर्मकार्य आणि नाथ संस्थानच्या उल्लेखनीय सेवेबद्दल ..धार्मिक रत्न …. हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महेश शिरोरे,सचिव श्री रमेश शिरोरे, श्री. दत्तात्रय शिरोरे, श्री वासुदेव मुसळे, श्री जितेंद्र वेढणे, श्री दिलीप सोनवणे श्री निलेश मुसळे या प्रतिष्ठानच्या मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पंढरीत हा धार्मिक रत्न पुरस्कार औसेकर महाराजांना देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे वारकरी संप्रदायातील योगदान नाथ संस्थानच्या गुरुपरंपरेतील आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीतील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार व सन्मान असून औसेकर महाराज म्हणजे, संप्रदायातील एक ऊर्जा व दिशा मार्गदर्शक देणारे व्यक्तित्व असे गौरउदगार शिरोळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महेश शिरोळे यांनी पुरस्कार प्रदान प्रसंगी काढले.
आषाढी वारीच्या पर्वात हा पुरस्कार महाराजांना मिळाल्याबद्दल समस्त वारकरी व शिष्य समुदायात आनंद व्यक्त होत आहे.
चाकूरकरांनी केले गहिनीनाथ महाराजांचे अभिनंदन

दरम्यान देशाचें माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी औसा येथील नाथ संस्थांमध्ये जात हभप गहिनीनाथ महाराज यांची भेट घेत त्यांना धार्मिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन यथोचित सत्कार केला ,आणि त्यांचे अभिनंदनही केले .त्यांच्या समवेत त्यांच्या सुनबाई डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.