कलयुगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा अनुभव
( वैभव रेकुळगे यांजकडून )
वडवळ नागनाथ दि.३० – चाकूर तालुक्यातिल आष्टामोड येथे रस्त्यावरील हाॅटेल मध्ये चिवडा घेण्यासाठी थांबले असता सोन्याच्या दागिन्यांची व रोख रकमेची सोबत असलेली लेडिज पर्स हॉटेल बाहेर पडली. दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स विकास गुरमे आणि त्यांच्या मित्र परिवाराने संबंधितास सुखरूप परत करून समाजात आजही प्रामाणिक पणा जीवंत असल्याचा अनुभव घडवत मानुसकिचे दर्शन घडविले.
लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गवर आष्टामोड येथे वडवळ नागनाथ येथील महादेव शंकर लिंबुटे आणि त्यांच्या पत्नी सोमवारी सायंकाळी लातूर हुन वडवळ कडे येत असताना चिवडा घेण्यासाठी थांबले. चिवडा घेऊन परतत असताना त्याची रोख रक्कम आणि सोन्याची दागिने अशी एकुन तिस तिस हजार रुपये किंमतीची असलेली पर्स हॉटेल बाहेर पडली. ती पर्स काही वेळाने विकास गुरमे आणि त्यांच्या मित्र परिवाराने पाहिली. पर्स उघडून पाहिले असता आत मध्ये रोख रक्कम आणि दागिने त्याच बरोबर आधार कार्ड आढळून आले. त्याचवेळी विकास गुरमे यांनी वडवळ नागनाथ येथिल त्यांच्या मित्राला संपर्क करून लिंबुटे नामक व्यक्तीची पर्स सापडल्याचे सांगितले. दरम्यान प्रवासात असलेले लिंबुटे दांपत्यासही आपली पर्स रस्त्यांत पडली असल्याचे लक्षात आले. घाबरलेले लिंबुटे दांपत्य घरणी येथुन आष्टामोड कडे पर्स चा शोध घेत असताना आष्टामोड येथुन भ्रमणध्वनी वर संपर्क करून पर्स सुखरूप असल्याचे सांगितले.
दरम्यान श्री.लिबुटे दांपत्यांनी आष्टामोड गाठले. यावेळी विकास गुरमे, ईश्वर चामले, भगवान गुरमे, शिवशंकर तात्तापूरे यांनी सोन्याच्या दागिन्यांची आणी रोख रकमेची पर्स सुखरूप परत करून प्रामाणिक पणा आणी मानुसकिचे दर्शनच घडविले आहे. विकास गुरमे व त्यांच्या मित्रांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आणि मानुसकी याबद्दल वडवळ च्या सोशल मीडियावर कौतुकाचा मोठा वर्षाव करून आभार मानले जात आहेत.