◆ आपली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण सर्वोत्कृष्ट उत्पादने सादर केली ◆
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२२: कृषी प्रक्रिया उद्योगक्षेत्राचे नेतृत्वस्थान निर्विवादपणे भूषवणारी कंपनी ही आपली ओळख अधिक मजबूत करत सोना मशिनरी आणि कॅन इंजिनीयरिंग सोल्युशन्ससारख्या त्यांच्या असोसिएटेड कंपन्यांनी प्रीमियम एक्झिबिटर्स म्हणून राईस अँड ग्रेन मिलिंग एक्स्पो २०२२ मध्ये भाग घेतला होता. ७ ते ९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान महाराष्ट्रातील गोंदिया येथे हे तीन दिवसांचे प्रदर्शन पार पडत आहे. आपली अत्याधुनिक उत्पादने व्यवसाय उद्योगांना त्यांची नफा मिळवण्याची क्षमता जास्तीत जास्त वाढवण्यात तसेच संचालनात होणारे नुकसान कमी करून कार्यक्षमतेमध्ये कशी सुधारणा घडवून आणू शकतात हे सोना मशिनरीने या प्रदर्शनामध्ये दाखवून दिले. संपूर्ण भारतभरातून तब्बल ५० हुन जास्त प्रदर्शक यामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ आणि इतर अनेक, प्रमुख बाजारपेठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांमधून येऊन लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये लघु स्तरावरील मिलर्सपासून मोठमोठ्या राईस/ग्रेन प्रोसेसिंग उद्योजकांचा देखील समावेश होता.
सोना मशिनरीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. वासू नरेन यांनी या प्रदर्शनामध्ये सांगितले, “राईस अँड ग्रेन एक्स्पो २०२२ सारखे उपक्रम म्हणजे कृषी-प्रक्रिया आणि राईस/ग्रेन मिलिंग उद्योगक्षेत्रामध्ये हितधारकांदरम्यान संवाद व ज्ञानाची देवाणघेवाण होण्यासाठी अनोखे मंच आहेत. अशा प्रकारच्या प्रदर्शनांमध्ये सोना मशिनरी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी आपली उत्पादने व सुविधा प्रदर्शित करणे म्हणजे या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात मोठ्या व लघु उद्योगव्यवसायांना आमचे तंत्रज्ञान जी अनोखी शक्ती प्रदान करू शकते ते दर्शवण्याची खूप मोठी संधी आहे. या प्रदर्शनामध्ये आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप खुश आहोत. संपूर्ण उद्योगक्षेत्रातील आमच्या सर्व हितधारकांसाठी सातत्याने जास्तीत जास्त मूल्य निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
राईस अँड ग्रेन मिलिंग एक्स्पो हे भारतातील तंत्रज्ञान-उन्मुख असे प्रमुख प्रदर्शन व परिषद आहे. देशातील तांदूळ व धान्य मिलिंग उद्योगक्षेत्रासाठी ते डिझाईन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीचे हे प्रदर्शन फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंडस्ट्रीज असोसिएशन व राईस मिलर्स असोसिएशन, गोंदिया यांनी सह-प्रायोजित केले होते. मध्य प्रदेश राईस मिलर्स असोसिएशन व ऑल इंडिया दाल मिलर्स असोसिएशन यांनी या प्रदर्शन आयोजनाला पाठिंबा दिला होता.