गोपाळ कुळकर्णी ,लातूर: संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजपाचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी ड्रग्जमाफिया विरुद्ध केलेले भाषण … बॉलिवूडमध्ये घुसलेली गंदगी साफ करण्यासाठी केलेली मागणी अनेकांना झोंबलेली दिसते .यामुळे आणि अनेकांची झोप उडाली आहे. ज्यांना उभादेश महानायक संबोधतो त्यांच्या महान पत्नी जयाजी बच्चन यांनी संसदेत आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत त्त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे .
. आम्हाला सुरक्षा द्या असा आर्जव करीत संसदेत अप्रत्यक्षपणे माफियांच्या समर्थन करीत याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आपल्याच इंडस्ट्रीज मधील सहकलाकारावर आगपाखड करून स्वतःवर शिंतोडे उडवून घेतले आहे.
सुशांत सिंग राजपूत या तरुण कलाकाराची आत्महत्या की हत्या केली याचा तपास अजुनही लागायचा आहे . या घटनेला शंभर दिवस उलटले असून सुशांतच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही . सुशांत सिंग राजपूत यांच्या कथित आत्महत्या की हत्या त् यावर कंगना रनौत या अभिनेत्रीने आवाज उठवला असताना तिच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत , एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सत्तेत असणारे येनकेन प्रकारे तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत…. तिच्यावर तुटुन पडत आहेत…. तिच्या घरावर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला . शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ‘ सामना ‘मध्ये उखाडा असा मथळा देत एका अभिनेत्रीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. आज सुशांतची तथाकथीत आत्महत्या की हत्या ? किंवा कंगना रनौच्या घरावर मनपाने केलेली कारवाई.. किंवा तिच्या वर होत असलेले शाब्दिक हल्ले यावर बोलण्यासाठी बॉलिवूडमधील एकही अभिनेता किंवा अभिनेत्री समोर आली नाही किंवा या घटनेचा साधा निषेधही केला गेला नाही . रिया प्चक्रवर्तीने उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे बॉलिवूडचे राजकारण चांगलेच तापले आहे , यामुळे एकच खळबळ माजली आहे . ज्यांना उभा देश महानायक संबोधतो ते महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील या प्रकरणावर गप्प बसणे ठरवलेले दिसते . या महानायकाच्या महान पत्नी जया बच्चन यांनी तर संसदेत कहरच केलेला आहे .ज्या माफिया बद्दल रवी किशन यांनी आवाज उठवला किंवा बॉलीवुडमधील गंदगी साफ करण्याची मागणी केली त्याचे समर्थन करण्याऐवजी जयाजी रवी किशन यांच्यावरच तुटून पडल्या आणि ‘ हमे सुरक्षा दो … !’असा टाहो फोडत आपले हसू करून घेतले.
रविशंकर हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत , ते गोरखपुर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात . त्यांनी जवळपास सहाशे पन्नासहून अधिक चित्रपटात काम केले आहे . त्यामुळे बॉलिवूड त्यांनी जवळून पाहिले आहे .बॉलीवूडमध्ये चाललेल्या सध्याच्या घडामोडीवर त्यांनी संसदेत आवाज उठवला … ड्रग माफिया बद्दल वक्तव्य केले … यात त्यांचे काय चुकले ? त्यामुळे जया बच्चन सारख्या अभिनेत्रीला राग यावा… हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नक्कीच नाही ! जयाजीनीअसे बोलायला नको होते बॉलिवूडमध्ये आज डग्ज माफियांचे साम्राज्यवाद फोफावत आहे .. यामुळे तरुण कलाकार बरबाद होत चालले आहेत … प्रसंगी ते आत्महत्या सारखा मार्ग अवलंबत आहेत . यामुळे बॉलिवूडला मोठा धोका निर्माण झाला आहे .यामागे मोठी यंत्रणा असू शकते , त्याच्या पाठीमागे कोण आहे ? याचा शोध पंतप्रधान मोदीजींनी घ्यावा आणि बॉलिवूडमध्ये घुसलेली गंदगी साफ करावी अशी मागणी रवी किशन यांनी केली यात त्यांचे कुठे चुकले ? उलट त्यांनी केलेल्या मागणीला सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा होता .पण तसे काही झाले नाही .आज जया बच्चन यांनी रवी किशन यांना ‘ जिस थाली मे खाते हो उसमे छेद करते हो क्या ? असा सवाल उपस्थित करीत त्यांना खजील करण्याचा प्रयत्न केला .महानायक यांच्या पत्नी असलेल्या या महान जयाजी नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत . त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा महानायक अमिताभ बच्चन समर्थन करतात का ? त्यांना ही भाषा योग्य वाटते का ? जयाजीच्या बोलण्यात त्या योग्य आहे असे त्यांना म्हणायचे आहे का ? आदी सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत .एकुणात , जयाजी यांचे हे वक्तव्य अमिताभ यांना अडचणीतच आणणारे आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.
जयाजींच्या वक्तव्यामुळे रवि किशन हे खूप दुःखी झाले आहेत . एका सामान्य कुटुंबात जन्मलेले रवि किशन यांनी खूपच स्ट्रगल करून आपल्या करिअरला सुरुवात करीत भोजपुरी व हिंदी आदी जवळपास सहाशे पन्नास चित्रपटात काम करीत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे .त्यांना कुठलाही गॉडफादर नाही किंवा त्यांच्या कुटुंबात कोणी चित्रपटात काम करणारा नाही .. असे असताना जयाजीनि त्यांना असे अपमानित करणे कितपत योग्य आहे ? बच्चन कुटुंबियांनी अथवा इतर क्कोणी त्यांना आश्रय दिला आहे का ? मग असे नसेल तर ‘ जिस थाली मे खाते हो ….. ही अपमानित’करण्याची जया बच्चन यांनी वापरलेली भाषा ही ही कितपत योग्य आहे ? ती अशोभनीय नक्कीच आहे .एखाद्या कलाकाराने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला किंवा बॉलिवूडला स्वच्छ करण्याची भाषा वापरली तर त्यात गैर काय ? ड्रग्ज माफियामुळे किंवा विविध बातम्यांमुळे आज बॉलिवूड कलंकित झाले आहे . डग्ज सेवनामुळे तरुणपिढी बरबाद होत आहे . मध्यंतरी एक उडता पंजाब हा चित्रपट बॉलिवूडमध्ये खळबळ माजवून गेला होता . आता सुशांत सिंग राजपूत यांच्या अकाली जाण्याने ‘उडता बॉलिवूड ‘ म्हणून ओळखला जात असेल तसेच बॉलिवूड जिवंत राहण्याची , फिल्म इंडस्ट्रीजमध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती घालून देण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे . पंतप्रधान मोदीजी हे या देशातील गंदगी साफ करण्यासाठी पुढे आले असताना आणि त्यांच्या समर्थनात एक तरुण खासदार संसदेत आवाज उठवत असताना त्यांचे समर्थन करणे तर दूरच उलट त्या खासदाराला अपमानित करण्याचे महापातक जयाजीनी केले आहे . हे न रुचणारे असेच आहे .जयाजीना भविष्यात याचे उत्तर द्यावेच लागेल.