लातूर–
वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, रोप निर्मिती, निसर्ग कविता, फुलपाखरू, मधमाश्यांचे ऋण व्यक्त करणे.
नवीन पिढीला निसर्गाशी जोडणे.
मानव आणि निसर्ग यांचे एक अतूट असे नाते आहे . निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू ,आकाश या पंचतत्वाच्या मिश्रणाने मानवी शरीराची निर्मिती झालेली आहे. त्यामुळेच “माती असशी मातीस मिळशी” अशी मानवी जीवनाची इतीश्री मानली जाते. मानवी जीवन जगवायला आणि समृद्ध करायला निसर्ग विविध अंगाने मदत करत असतो असे प्रतिपादन सह्याद्री देवराई व वृक्ष चळवळ लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी सह्याद्री देवराई झरी रामवाडी ता चाकुर येथे घेण्यात आलेल्या निसर्ग शाळा या उपक्रमात व्यक्त केले.
आज श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या शाळा लातूर च्या जवळपास दोनशे विद्यार्थिनी ४ बसेस व इतर वाहन करून सह्याद्री देवराई झरी-रामवाडीरामवाडी हा प्रकल्प पाहण्यासाठी सकाळी आल्या.
जवळपास चार वर्षांपूर्वी २०१७/१८ मध्ये बोडके उजाड माळरान असलेल्या या तीन डोंगरांच्या समुहावर सह्याद्री देवराई प्रकल्प उभा आहे . जवळपास ४३ हजार पेक्षा जास्त झाडे पावसाच्या पाण्यावर डोंगर उतारावर आडवे समतोल चर मारून जगवलेली आहेत. या निसर्ग शाळा संकल्पना राबवणारे सुपर्ण जगताप यांनी मुलींना अनेक गोष्टींची प्रत्यक्षात माहिती दिली.
निसर्गात वृक्षवेली हे स्वतः जगत असतात. पण मानवी उपद्रवामुळे जंगलाचा ऱ्हास होत गेला. त्यामुळे आजचा माणूस हा शुद्ध हवेसाठी, शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याची कारणे पण समजून सांगितली.
या पृथ्वीवर या पृथ्वीवर आपल्यासोबत असंख्य सूक्ष्म जीव जीवांचे वास्तव्य आहे. आणि त्यांचा यावर हक्क देखील आहे .एक वृक्षाच्या परिसंस्थेत मुंगी पासून हत्तीपर्यंत या सगळ्यांना अन्न मिळण्याचे माध्यम म्हणजे वृक्ष आहे हे देखील यावेळी समजून सांगितले.
तसेच फुलपाखरू, मधमाश्या , पक्षी,चिमण्या, खारुताई, वृक्षवेली सूर्य ,आकाश, हवा ,पाणी ,पृथ्वी या सगळ्यांचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व देखील सर्व शाळेय मुलींना समजून सांगण्यात आले. आपण कायम यांच्या ऋणात राहायला हवे.
हि संपूर्ण देवराई आठ किलोमीटरचा परिसर हा चालत भटकंती करत मुलींनी शिस्तबद्ध पद्धतीने फिरुन पाहीला. डोंगरावरुन त्यांना देवराई परिसरातील तलाव पण पाहीला.
तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनासाठी श्रमदान केले व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण पण करण्यात आले.
त्यानंतर सर्व जण सह्याद्री देवराईच्या पायथ्याशी असलेल्या चारशे वर्ष वयाच्या वडाच्या झाडाच्या सानिध्यात गेले.
महाराष्ट्रातील नंबर दोन सर्वात मोठे असलेल्या वडाच्या वटवृक्षाच्या प्रेरणामुळे ही देवराई सयाजी शिंदे यांच्या याच वट वृक्षाखाली घेतलेल्या निसर्ग शाळा या उपक्रमामुळे उभी राहिली. आज पुन्हा त्याच्या सानिध्यात सर्वांनी एकत्र बसून अंगत पंगत करत डबे खाल्ले.
नंतर आँनलाईन वर सह्याद्री देवराई चे सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि चला हवा येऊ द्या चे पत्र लेखन करणारे कवी, लेखक श्री अरविंद जगताप यांच्या शी संवाद साधला.
दहावीच्या पुस्तकात “आप्पाचे पत्र” हा धडा असलेल्या श्री अरविंद जगताप लेखकाशी बोलता आल्यामुळे तसेच सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी बोलता आल्यामुळे सर्व मुलींचा दिवस खूप उत्साही गेला.
जेवणानंतर दुपारच्या सत्रात लेखक, कवी अरविंद जगताप यांची “झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे” ही कविता घेण्यात आली आणि या एक दिवसीय कार्यशाळेचे समारोप या परीसरात वडाचे झाड लावून करण्यात आला.
आजच्या कार्यशाळेसाठी सह्याद्री देवराई लातूर, वनविभाग, तसेच जिल्हा परिषद शाळा झरी खुर्द, ग्रामपंचायत झरी खुर्द सोबत सर्वात महत्वाचे श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका या सगळ्यांचे सहकार्य लाभले. अश्या ह्या खेळीमेळीच्या वातावरणात निसर्ग शाळा संपन्न झाली.
निसर्ग शाळा ह्या अभिनव उपक्रमाद्वारे आपण नवीन पिढीला निसर्गाबद्दल ज्ञान देऊया, त्यांना घडवूया आणि हि पृथ्वी मानवी जीवांसाठी जगण्यायोग्य ठेवूया हा संदेश या निसर्ग शाळा या उपक्रमातून देण्यात आला.
सह्याद्री देवराई लातूर व वृक्ष चळवळीचे सुपर्ण जगताप यांनी मुलींना निसर्ग शाळेत अनेक गोष्टींची माहिती दिली. कविता पण म्हणून घेतली. व घरच्या घरी बियांपासून वृक्ष निर्मिती कशी करायची याची माहिती दिली. या उपक्रमासाठी
वन परीमंडल अधिकारी चाकुर श्री एस. एस. म्हस्के ,अमोल सुर्यवंशी वनसेवक चाकुर,
श्रीमती गोदावरी देवी कन्या शाळेच्या निरीक्षिका व इतिहास प्रमुख सौ वर्षा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी सौ कमल खिंडे, भुगोल विभाग प्रमुख सौ गायत्री ठाकूर, सौ सुजाता शास्त्री , सौ सिंधू वाघमारे, सौ आशा लोंढे, श्रीमती ज्योती भातीकरे, सौ प्रतिभा चोपणे, सेविका प्रबोधिनी खलसे, श्री शाम नावंदर व श्री भागवत रंकाळे जि. प. शाळा झरी खु. मुख्याध्यापक श्री डिकळे सर, सह्याद्री देवराई चे स्वयंसेवक
सुर्योदय बोइनवाड, संदीप घुगरे हे उपस्थित राहुन निसर्ग शाळा उपक्रमासाठी सहकार्य केले.