21 C
Pune
Wednesday, December 25, 2024
Homeराजकीय*सर्व घटकांना दिलासा देणारा पहिलाच अर्थसंकल्प-आ.कराड*

*सर्व घटकांना दिलासा देणारा पहिलाच अर्थसंकल्प-आ.कराड*

महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील अर्थसंकल्‍प 

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांची प्रतिक्रिया 

लातूर दि.०९– नमो शेतकरी महासन्‍मान योजना, जलयुक्‍त शिवार-२ सुरू करणार, महिलांना एस.टी. बस प्रवासात ५० टक्‍के सवलत, मुलीच्‍या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासनाची, महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेत दिड लाखाहून पाच लाखाची मर्यादा, मोदी आवास योजनेतून दहा लाख घरे बांधणार आदीची तरतूद करून शाश्‍वत शेती, समृध्‍द शेतकरी, महिलासह गोरगरीब सर्वसामान्‍यांना दिलासा देणारा आणि ग्रामीण भागाच्‍या सर्वांगीन विकासाला चालना देणारा महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील पहिला भाजपा सेना युतीचा अर्थसंकल्‍प असल्‍याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली.

राज्‍यातील भाजपा सेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्‍प राज्‍याचे अर्थमंत्री म्‍हणून उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभा सभागृहात पंचामृत ध्‍येयावर आधारीत सादर केला असल्‍याची माहिती देवून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, बळीराजाच्‍या उत्‍पन्‍नासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुरू केलेल्‍या पंतप्रधान कृषीसन्‍मान योजनेत राज्‍यशासन नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेद्वारे अनुदानाची भर घालणार असून प्रतिवर्षी शेतकर्‍यांना केंद्र शासनाप्रमाणे राज्‍यशासनाचेही सहा हजार रूपये अनुदान देणार यामुळे शेतकर्‍यांना आता दरवर्षी बारा हजार रूपये मिळणार असल्‍याची घोषणा देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. शेतकर्‍यांना केवळ एक रूपयात पिकीविमा यासह कर्जमाफीचा लाभ उर्वरीत पात्र शेतकर्‍यांना देणार असून मागेल त्‍याला शेततळे योजनेचा व्‍यापक विस्‍तार करण्‍याचे, शेतीविषयक पायाभूत सुविधा पुरविण्‍याचे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्‍साहन देण्‍याचे घोषीत केले. 

एस.टी. महामंडळाच्‍या बस मधून प्रवास करणार्‍या सर्वच महिलांना प्रवास तिकीटात पन्‍नास टक्‍के सवलत देण्‍याची घोषणा करण्‍यात आली असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नावाने मोदी आवास योजना सुरू करून या योजनेद्वारे दहा लाख घरे बांधणार असल्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगीतले. मुलीच्‍या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना नव्‍या स्‍वरूपात मांडून पिवळया आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटूंबात मुलगी जन्‍मल्‍यानंतर पाच हजार रूपये, मुलगी सहावीत गेल्‍यास सहा हजार, आकरावीत गेल्‍यानंतर आठ हजार आणि मुलगी आठरा वर्षाची झाल्‍यानंतर पंचाहत्‍तर हजार रूपये देण्‍यात येणार असल्‍याचे घोषीत केले. शहराकडे होणारे स्‍थलांतर थांबविण्‍यासाठी गावागावात विकास कार्यक्रम राबविण्‍याचे त्‍याचबरोबर महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत दिड लाखाची मर्यादा वाढवून पाच लाख करण्‍यात आली आहे. तर राज्‍यात स्‍व. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या नावाने ७०० दवाखाने सुरू करण्‍यात येणार आहेत यामुळे सर्वसामान्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

महाराष्‍ट्र राज्‍यात सत्‍तांतर होवून सत्‍तेवर आलेल्‍या मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या सरकारने आजपर्यंत शेतकर्‍यांसह गोरगरीब सर्वसामान्‍य माणासाला मोठा दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. या सरकारने विधानसभा सभागृहात सादर केलेला अर्थसंकल्‍प शेतकरी, महिला, मागासवर्गीय, ओबीसीसह सर्व घटकांना मोठा‍ दिलासा देणारा आणि ग्रामीण भागाच्‍या सर्वांगीन विकासाची तरतूद करणारा महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील पहिलाच आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]