24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*सफरचंद:मनाला गवसणी घालणारा सुंदर नाट्यप्रयोग !*

*सफरचंद:मनाला गवसणी घालणारा सुंदर नाट्यप्रयोग !*

सफरचंद – खरं म्हणजे केवळ एक फळ ! पण त्याचं रंगरूपही विशिष्ट ! लाल … रक्तिम फळ … !
पण त्याला कुणाचं रक्त लागलेलं असेल, तर … !
आपल्या काश्मीरमधील ह्या फळाला असंच काही झालं आहे का ?

काश्मिरातल्या अतिरेकी कारवायांच्या धांदलीत घडलेली मानवी जीवनाची संघर्षकथा, त्यात दडली-दडपलेली काश्मिरातल्या पाण्याच्या प्रवाहाची तरलता, प्रत्यक्ष गोळीबार बॉम्बस्फोट यांच्या आभासांचा थरथराट आणि दोन प्रेमिक जिवांसह गुंतलेल्या मानवतेची कथा – काश्मिरला वेगळी ओळख देणाऱ्या रक्तिम सफरचंदांची सकस कथा !

तादात्म्याशीही प्रामाणिक अभिनय, काश्मिरमधल्या घराचे फिरत्या रंगमंचावरचे रम्य दर्शन देणारे नेपथ्य, गूढ आनंद देणारे संगीत आणि प्रसंगांना अनुरूप असा दृश्यविलास म्हणजे ‘ सफरचंद ’ हे नाटक.

रंगमंचावर काय काय दाखवणं शक्य आहे याची प्रचीती देणारा नाट्यानुभव !


मनाला गवसणी घालणारा सुंदर नाट्यप्रयोग !

भूमिका – शर्मिला शिंदे (‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधली ‘जेनी’), संजय जमखंडी, प्रमोद शेलार, आमीर तडवळकर आणि शंतनू मोघे (‘संभाजी’ मालिकेतल्या शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले)

लातूरच्या दगडोजीराव देशमुख नाट्यगृहाच्या रंगमंचावर आज दि. १६ सप्टेंबर, २०२३ रोजी – इंडियन मेडिकल असोसिएशन (व त्यांची वुमेन्स विंग), नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, रजनीगंधा फाउंडेशन आणि सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने.
अजूनही शिल्लक तिकिटांवरून, कुठूनही तितकेच सुंदर दिसणारे नाटक ! लवकर तिकिटे राखून ठेवा.

तिकिटांसाठी संपर्क – 98901 18390 (नंदकिशोर वाकडे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]