32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’*

*सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’*


नवी दिल्ली, 12 : मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे.
येथील आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील 3 वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार, निवडणूक आयुक्त श्री अनुप चंद्र पांडे आणि श्री अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढव‍िण्यासाठी श्री तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक फायदा होण्याच्या दिशेने त्यांचे ईसीआयचे ‘नॅशनल आयकॉन’ होणे अधिक महत्वाचे ठरेल.


याप्रसंगी सचिन तेंडुलकर म्हणाले, भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरूणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देताना, इंडिया..इंडिया असा जयघोष करणारी ‘टमि इंडिया’ समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर प्रचंड गर्दी जमते त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवूया असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरूण मतदार निवडणुकीत सहभागी होणार, तेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल.

        मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार याप्रसंगी म्हणाले, श्री तेंडुलकर भारताचेच नव्हे तर जागतिक स्तरावरील आदण‍ीय खेळाडु व्यक्तीमत्व आहेत. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय उल्लेखनीय, टिमवर्क आणि यशासाठी अथक प्रयत्नांची कटिबद्धता असल्याचे आपण पाहिलेले आहे. यामुळेच ईसीआयची फलंदाजी करण्यासाठी त्यातून मतदांराची संख्या वाढविण्यासाठी  ते एक आदर्श पर्याय ठरतील. श्री कुमार यांनी सांगितले की, या तीन वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वरील टॉक शो, कार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांव्दारे श्री तेंडुलकर मतदारांमध्ये मतदानाविषयी  प्रचार प्रसार करतील.  यामाध्यमातून मतदानाचे महत्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते क‍िती महत्वाचे आहे हे मतदारांना पटवून सांगतील. 
        कार्यक्रमामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यामध्ये मतदानाचे महत्व या विषयावर प्रभावी नाटक सादर केले. 
        यापुर्वी भारतीय निवडणुक आयोगाने विविध क्षेत्रातील प्रस‍िद्ध व्यक्तींना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त करते. यापुर्वी सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, पंकज त्रिपाठी, खेळाडु मेरी कोम एम.एस धोनी ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले गेलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]