नांदेड ; ( वृत्तसेवा )-मैत्र हे शब्द सुरांचे या सह्याद्री वाहिनीच्या रसिकप्रिय असलेल्या कार्यक्रमांमध्ये दिनांक 17 मार्च 2024 रविवार या दिवशी 8 वाजून 30 pm मिनिटांनी व पून:प्रक्षेपण दिनांक 24 मार्च 2024 ला सकाळी 10 वाजता व सायंकाळी 7 वाजता संगीतकार आनंदी विकास या आपल्या भेटीस येणार आहेत.
प्रसिद्ध संवादक विघ्नेश जोशी यांनी संगीतकार आनंदी विकास यांना छान बोलते केले आहे आणि त्यांचा यशस्वी प्रवास रसिकांच्या समोर आणला आहे. आनंदी विकास यांच्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहगायक म्हणून विश्वास आंबेकर आणि सहगायिका म्हणून मयुरी अत्रे आहेत. संवादिनी विकास देशमुख ,तबला वेदांत कुलकर्णी ,कीबोर्ड प्रथमेश कानडे या सर्वांनी पण उत्तम साथ संगत केली आहे.

आत्तापर्यंत संगीतकार आनंदी विकास यांनी सह्याद्री वाहिनीवरून m2 G2, कला डायरी, तक धिना धिन, हॅलो सखी ,सखी सह्याद्री, बालचित्रवाणी, नमस्कार मंडळी मधून रसिकांच्या भेटीला आल्या आहेत तर झी मराठी वरून अवघा रंग एक झाला या कार्यक्रमांमध्ये यांची विठ्ठलाची 25 गाणी सातत्याने रसिकांच्या भेटीला येत असतात तसेच ई टीव्ही मराठी वरून भजन स्पर्धेचे 75 भागाचे परीक्षण देखील त्यांनी केले आहे. त्याचबरोबर आकाशवाणी, OTT ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील त्यांची गाणी श्रोत्यांना ऐकावयास मिळतात.
आनंदी विकास यांच्या आत्तापर्यंत 30 च्या वर ध्वनीमुद्रिका ,10 च्या वर थीम साँग रसिकांच्या सेवेत आहेत तर त्यांनी असंख्य भावगीते,भक्तिगीते ,लोकगीते ,बालगीते ,चित्रपट गीते रसिकांना दिली आहेत ..
मैत्री शब्द सुरांचे हा कार्यक्रम रसिकांनी आवर्जून पहावा असा आहे..