देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी
आमदार कराड यांच्या कार्यालयाचे उद्घाटन
औसा येथे शेतरस्त्याचे लोकार्पण आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन
लातूर दि.०२– महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस हे दि.०४ जून २०२२ रोजी लातूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात लातूर आणि औसा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.
दि.०४ जून २०२२ शनिवार रोजी सकाळी ८.३० वाजता माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते विधान परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या “संवाद” या लातूर येथिल अंबाजोगाई रोड वरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तर आ. अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या औसा विधानसभा मतदार संघातील एक हजार शेतरस्त्याचे त्याचबरोबर एक हजार जनावरांच्या गोठ्याचे लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे औसा येथे सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
ऐकण्यासाठी क्लिक करा.,👇👇👇👇👇
या दोन्ही कार्यक्रमास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आलेल्या लातूर येथिल “संवाद” जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळ्यास आणि औसा येथिल शेतकरी मेळाव्यास लातूर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, भाजपा कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येंनी उपस्थित राहावे असे अवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.