संत गजानन महाराज देवस्थानचे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान शेगावात
असे मैदान महाविद्यालयामागील परिसरातील एक टेकडी खोदून क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले.
धावपट्टी – ५० बाय १०० मीटर
बाउंड्री – ७१ यार्ड, दोन्ही बाजू समान
अमेरिकन ब्ल्यू ग्रास रोवण्यात आले. पाणी पुरवठा करण्यासाठी अंडरग्राउंड ३७ पॉपअप आहेत.
बीसीसीआयशी करारानंतर रणजीचे सामने रंगणार :
येथे जून-जुलैमध्ये नॉर्थ-ईस्ट क्रिकेट संघांची रणजी ट्रॉफी स्पर्धा हाेईल. यासाठी बीसीसीआयची टीम निरीक्षणासाठी येणार आहे. त्यानंतर शेगाव मैदान समिती व बीसीसीआयमध्ये करार होईल. या स्पर्धेत आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम संघ खेळणार अाहेत.
सरावानंतर दिव्यांग वर्ल्ड चॅम्पियन :
वर्ल्डकपपूर्वी दिव्यांग टीमच्या खेळाडूंनी येथे सराव केला. त्यांनी भारताला वर्ल्डकप मिळवून दिला. या वेळी विजेत्यांनी शेगावच्या या मैदानाचा खास उल्लेख केला होता.
ऑस्ट्रेलियासारखे आहे आरामदायी आसनव्यवस्था :
ऑस्ट्रेलियासारखे ग्रीन टेकडीवरची आसनव्यवस्था येथे तयार करण्यात येणार आहे. याचे छत कौलारू राहील. त्यामुळे अनेक तास क्रिकेटचा आनंद मिळेल.
विदर्भातील पहिलेच इनडोअर सराव केंद्र :
येथे विदर्भातील पहिलेच इंनडोअर सराव सेंटर उभारण्यात येत आहे. सराव सेंटरवर ५ धावपटी(पिच) असतील. ५० बाय १०० मीटरच्या पिचवर विदेशी सिंथेटिक व ग्रीनमॅट असेल. नजीकच्या काळात बॉलिंग मशिंनचीही सुविधा येथे उपलब्ध होईल. सध्या इनडोअर केंद्राचा ढाचा तयार झाला.