निलंग्यात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रक्तदानाच्या महायज्ञाकरीता शिवप्रेमींना अरविंद पाटील निलंगेकर यांचे आवाहन
निलंगा,-( प्रतिनिधी)-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निलंग्यात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार असून जयंतीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय येथे सायं ५ वा. ११ हजार चौरस फूट आकाराचे भव्य विश्वविक्रमी तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच,सायं ६ वाजता डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर सांस्कृतिक सभागृह येथे शिवव्याख्याते प्रा.गंगाधर बनबरे यांचे “लढाया पलीकडचे छत्रपती शिवाजी या विषयावर व्याख्यान होणार आहे.तसेच दि.१९ फेब्रु.रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे “रक्तदानाचा महायज्ञ” केला जाणार आहे यासाठी “एक घर एक रक्तदाता” या विचाराने रक्तदान मोठ्याप्रमाणात होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. देशात सद्यस्थितीत रक्तचा तुटवडा निर्माण झाल्याने आपले रक्त आनेकांचे प्राण वाचवू शकते त्यामुळे शिवप्रेमींनी मोठ्याप्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती निलंगा यांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाअभिषेक करुन ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ३९२ व्या शिवजयंती निमित्त ३९२ वृक्षांची लागवड शहरात करण्यात येणार आहे.
या शिवजमोत्सात कोरोना नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी केले आहे.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती चे पदाधिकारी डॉ.एस. एस शिंदे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, विरभद्र स्वामी, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, डॉ. लालासाहेब देशमुख, दत्ता शाहीर, प्रल्हाद बाहेती, विनोद सोनवणे, शेषराव ममाळे, अंबादास जाधव, कुमुद लोभे, डॉ.प्रमोद हातागळे, डॉ.किरण बाहेती, डॉ.नितीन जाधव, शरद पेठकर, माऊली बरमदे, नसीम खतीब, प्रमोद कदम, पाशांमिया आत्तार, शफी भंगारवाले, किशोर लंगोटे, प्रसाद मुळे,बंटी देशमुख,नशीम खतीब,इरफान सय्यद, मुजीब सौदागर,जाफर आलवी , नयन माने, अनिल जाधव, पिंटू पाटील, माऊली भोसले, रवी फुलारी, सुमित ईनानी, जयंत देशपांडे, पिंपळे आशिष अट्टल, सुनिल टोम्पें, हरिभाऊ टोम्पें यांच्या वतीने शहरात नियोजन करण्यात येणार आहे.