उदगीर (दि13) येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात या शैक्षणिक वर्षातील स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून संपन्न झाले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार उपस्थित होते तर प्रमुख अतिथीस्थानी मुख्याध्यापक बाबूराव आडे ,उपमुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड उपस्थित होते.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय व्हाॕलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्या खेळांडूचे व मार्गदर्शक शिक्षक संतोष कोले यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.कोरोनानंतर प्रथमच होणाऱ्या या स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांची माहिती व स्नेहसंमेलनाचे महत्व स्नेहसंमेलन प्रमुख अनिता यलमटे यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार वाघमारे तर आभार स्नेहसंमेलन सहप्रमुख लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले.उद्घाटन प्रसंगी दहावी वर्गांच्या मुलांचे खो-खो व मुलींचे लंगडी सामने संपन्न झाले.या स्पर्धेचे पंच म्हणून पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,क्रीडा स्पर्धा प्रमुख संतोष कोले, संदीप जाधव,प्रिती शेंडे,आशा कल्पे ,भास्कर डोंगरे,शंकर वाघमारे,राजकुमार म्हेत्रे,सुप्रिया बुधे,श्रद्धा पाटील व दहावीच्या सर्व वर्गशिक्षकांचे सहाय्य लाभले.