29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य*शब्दांकित साहित्य मंचावरझाली श्रावण सरींची बरसात…*

*शब्दांकित साहित्य मंचावरझाली श्रावण सरींची बरसात…*

लातूर; ( वृत्तसेवा )-शब्दांकित साहित्य मंच द्वारा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. काव्य संमेलनाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली.अतिशय देखण्या आणि दिमाखदार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ योग शिक्षिका श्रीमती कुंदाताई टेकाळे व अध्यक्ष कवयित्री निलीमा देशमुख होत्या. प्रास्ताविक उषाताई भोसले यांनी अतिशय सुंदर रित्या मांडले.
संस्थापक अध्यक्ष नयन भादुले-राजमाने’ साहित्यनयन’ लातूर यांनी उत्तम आयोजनाबद्दल शब्दांकित साहित्य मंच सदस्य शीला कुलकर्णी यांचे अभिनंदन करत भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. कुंदाताई टेकाळे यांनी ,करो योग, रहो निरोग*असा संदेश आपल्या भाषणात दिला. रिमझिम पावसात श्रावण सरी काव्यरूपात बरसत होत्या


आज बुंदोने ,पैंगाम भेज कर, बादल ने शोर मचाया है ,खतम हुआ इंतजार, आज मन भावन सावन आया है, स्वाती जोशी यांच्या बहारदार कवितेने सुरुवात झाली वृषालीताई पाटील यांनी, मेघ जमले आभाळी, चढे रंग पावसाळी ,बळी विणे स्वप्न जाळी, उजवण्या लेकीबाळी सख्या पावसा पावसा ,स्वप्नी एकदा तू यावे ,चिंब भिजल्या वेलींनी, मोर अंगी थिरकावे , उषाताई भोसले यांच्या या कवितेला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळत होती
डाॅ.नयन राजमाने यांच्या, “येई मनात दाटूनी आसवांचा ग बहर, मखमली आयुष्याला, नको लावू ग नजर “, प्रत्येक कवितेला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळत होती.


या श्रावण सरी कवयित्री संमेलनाला शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नयनताई राजमाने,अध्यक्षा विजयाताई भणगे व सचिव उषाताई भोसले यांची विशेष उपस्थिती होती. तसेच कवयित्री संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन तहेसीन सय्यद मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन शीला कुलकर्णी यांनी मानले.
या कवयित्री संमेलनाला मालिनी कुलकर्णी ,उमा कुलकर्णी, स्वाती देशपांडे,स्वाती जोशी, सत्यशीला कलशेट्टी मॅडम इ.रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत कवयित्री संमेलन यशस्वीरित्या पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]