विश्वजीत गायकवाड यांची मनोज जरांगे यांच्या भेटीने उदगीरमध्ये समीकरण बदलले ..
उदगीर .(माध्यम वृत्तसेवा):– येथील इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीतील चर्चेने उदगीरची राजकीय समीकरणे बदलली आहेत . अंतरवाली सराटी (जालना )येथे मराठा नेते मनोजदादा जरांगे पाटील यांची विश्वजित गायकवाड शिष्टमंडळातील सदस्य निवृत्ती सांगवे (माजी नगरसेवक तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंच), संजय कुमारचं बहुजन विकास अभियान पंकज काटे (युवा भीम सेना), संभाजी तिकटे (भारतीय दलित पॅंथर), प्रकाश मसुरे, नौशाद मौलाना, मुना मदारी (माजी नगरसेवक) आदी पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेण्यात आली .
यावेळी मनोजदादा जरांगे पाटील यांनी विश्वजित गायकवाड यांना आशीर्वाद देत राखीव मतदारसंघातही लढवय्ये उमेदवार आपल्या विचाराचे मिळाले तर तिथेही पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेऊ असे सांगितले.
पुढे बोलतांना ते असंही म्हणाले की, मी जेव्हा पाठिंबा देईल तेव्हा सकल समाज त्या उमेदवाराला विधानसभेत पाठवेल, आणि आमच्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल असे सांगितले .
यावेळी मनोज दादांसोबत उदगीर विधानसभेतील समीकरणांवर सखोल चर्चा करण्यात आली तसेच यावेळी इंजिनीयर विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती देखील त्यांनी घेतली.
उद्या गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीत आपल्यासारख्या अशाच जबाबदार उमेदवारामागे ताकद उभी करण्याचा निर्णय होईल अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी यावेळी बोलतांना आश्वस्त केले.