डॉ बाबासाहेबांच्या मानवंदनेची कमतरता अस्थि कलशामुळे झाली दूर
विश्वजीत गायकवाड यांच्यामुळे मानवंदना देणे झाले शक्य
उदगीर : ( माध्यम वृत्तसेवा):–शहरांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या जागी तेथे बांधकाम चालू आहे , यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनी मानवंदना देणे शक्य नव्हते . याबाबत प्रशासनाने कोठलेही व्यवस्था केली नव्हती . याबाबत नागरिकांनी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्याकडे भावना व्यक्त केल्यानंतर त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थी कलश उदगीर मध्ये आणला.

यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिवशी नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान वंदना दिली , यामुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याची कमतरता दूर झाली. विजयादशमीच्या दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणे ही अनेक वर्षाची परंपरा आहे .मात्र यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नागरिकांसाठी उपलब्ध नसल्यामुळे मानवंदना देता येणार नाही याची खंत नागरिकांना होती .

इंजि. विश्वजीत अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत नागपूर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीकलश उदगीर मध्ये आणण्यात आले . या अस्थिकलशाची भव्य मिरवणूक शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक येथून विश्वशांती बुद्ध विहार पर्यंत काढण्यात आली . यावेळी विश्वजीत गायकवाड यांनी अस्थिकलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला .

यावेळी उदगीर देवणी जळकोट या भागातील हजारो नागरिकांनी या अस्थिकलशाचे दर्शन घेतले . यासोबतच यावेळी हजारो बौद्ध उपासकांच्या सोबत थायलंड, श्रीलंका, व्हिएतनाम, जपान, कंबोडिया, मुंबई येथील बौद्ध भिक्षू महासंघ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
विश्वजित गायकवाड फाऊंडेशन मार्फत आणण्यात आलेल्या अस्थिकलशामुळे यावर्षी मानवंदना देता आली अशी भावना नागरिक व्यक्त करीत होते .
