विधायक उपक्रम ः वृक्षारोपन, अन्नदान व कीर्तनाने वाढदिवसाची सांगता
लातूर दि.11/07/2023
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरातील गौरीशंकर व सिध्देश्वर मंदिरात अभिषेक, सुरतशहावली दर्गा, शेखमियाँ साहेब दर्गा,कव्हा येथे चादर चढविणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूग्ण व नातेवाईकांना अन्नदान, मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान, अपंगाना सायकलचे वाटप, वृक्षारोपन अशा अनेक उपक्रमाने मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, न्यायाधिश ए.आर.कुरेशी, आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यामध्ये वाढदिवसानिमित्त मंगळवारी सकाळी 8.00 वा मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरामध्ये भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत महाअभिषेक करण्यात आला. यावेळी श्री.भगवान गौरीशंकर व्यवस्थापन मंदिर कमिटीचे अॅड.गंगाधर हामने, बापुअप्पा सोलापूरे, गोवर्धन भंडारी, निळकंठराव पवार, सुभाषअप्पा सुलगुडले, रामभाऊ माळगे, नंदकिशोर सोनी, प्रभाकर जोशी, आत्माराम झिरमिरे, एमएनएस बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, जय साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड,प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक संजय बिराजदार, एन.डी.सराफ, राजकुमार शेटे आदींची उपस्थिती होती.
कव्हा येथील शेखमियॉ दर्गा येथे भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते चादर चढविण्यात आली. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भागवतराव घार, शिवाप्पा पाटणकर, अशोक पाटील,शेषेराव रूकमे, दत्तू कदम, अच्यूत पाटील, शिवशरण थंबा, नेताजी मस्के, सदाशिव सारगे, दत्तप्रसाद खंडागळे, दिपमाला मस्के, अरूणा कांदे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. तसेच सुरतशहावली दर्गा येथे गणेश कदम यांच्याहस्ते चादर चढविण्यात आली. यावेळी अब्दूल गालीब शेख, अनिल सोमवंशी यांची उपस्थिती होती. तसेच सिध्देश्वर मंदिरात बाबासाहेब कोरे यांच्याहस्ते महाअभिषेक करण्यात आला. याबरोबरच मातोश्री वृध्दाश्रम, शासकीय रूग्णालय व हासेगाव येथील सेवालयामध्ये अन्नसेवा देण्यात आली.
यावेळी जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, प्राचार्य गोविंद शिंदे, उपप्राचार्य मारूती सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, प्रविण जाधव, डी.एम.पाटील, गणेश पवार, सुजीत साखरे, भूजंग पवार, आशिष काटे, दीपक पवार, धनंजय तांदळे, सरदार शेख, पंकज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अपंगांना सायकलचे वाटप करण्यात आले.
सकाळी 9 वाजता त्यांच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते केक कापून कुटुंबियासमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रमोदिनी पाटील कव्हेकर, विश्वजीत पाटील, मुलगी अश्विनी पाटील, स्नुषा आदितीताई पाटील कव्हेकर, भाच्चे निळकंठराव पवार, धनराज पाटील धामणगावकर, अद्वेत पाटील, अविष्का-अद्विका पाटील यांच्यासह कव्हेकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.
भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर, विजय पाटील धामणगावकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामुहिक सत्कार करण्यात आला. यावेळी मोहनराव भोसले, पांडुरंग जाधव, बाबूराव पाटील, विश्वनाथ रोडगे, परमेश्वर रोडगे, कव्हा पी.एच.सी.चे डॉ.रज्जाक बिरादार, अंगणवाडी महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख, श्रीकांत खंडागळे, शहाबुध्दिन पठाण, विठ्ठलराव भोसले, दत्ता भोसले, बळवंत माळी, भरत शिंदे, उध्दव जाधव, सुनिल जाधव, ग्यानदेव बोळंगे, संजय माळी, तानाजी भोसले आदी उपस्थित होते.
तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक संभाजीराव पाटील रावणगावकर, समन्वयक बापूसाहेब गोरे, विठ्ठल-रूक्मिनी मंदिर कमिटीचे कोषाध्यक्ष दिगंबर शेटे, ह.भ.प.ज्ञानेश्वर चाटे महाराज, तुळशीराम कोयले, डॉ.व्यंकट जाधव, नागनाथ चामवाड, राजकुमार शेटे, चंद्रकांत वैरागकर, डॉ.वेदांत अवस्थी, साहित्यिक विवेक सौताडेकर, विनोद जाधव, दिलीप पाटील, बाबासाहेब कोरे, एम.एन.एस.बँकचे संचालक सूर्यकांतराव शेळके, रविंद्र कांबळे, जमिलभाई मिस्त्री, विश्वास जाधव, नितीन कोरे, नंदू वाकडे, एम.एन.एस.बँकेचे माजी कार्यकारी संचालक अमरदीप जाधव, एमएनएस बँकेचे जनरल मॅनेजर गहिरवार, आप्पासाहेब पाटील, सहदेव मस्के, महादेव गायकवाड, भूजंग पाटील, दत्ता पाटील, राम घाडगे, दत्ता परळकर, डिगोळे, रासपचे जिल्हाध्यक्ष दादा करपे, नगरसेविका रागिणी यादव, प्रा.सतीश यादव, पत्रकार शहाजी पवार, संगम कोटलवार, रामेश्वर बद्दर, संजीव पाटील, योगीराज पिसाळ,सचिन चांडक, वैभव पुरी, राजेभाऊ जाधव, सफी सय्यद , अंकलकोटे आप्पा, जयद्रथ जाधव, जाफर पटेल, बालाजी शेळके, केशरताई महापुरे, संजय गिर, शाहूराज भोसले, मुख्याध्यापिका सुनिता मुचाटे, रोहित पाटील, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य सचिदानंद जोशी, आशा जोशी, शैलेश कचरे, सुरेंद्र जाधव, देवा जाधव, प्राचार्य गोविंद शिंदे, मनोज गायकवाड, राजकुमार साखरे, बाबासाहेब देशमुख, राजेभाऊ मुळे, साहेबराव पाखरे, पंकज देशपांडे, सागर घोडके, पूनम पांचाळ, धनंजय देशमुख, अष्टेकर महाराज, कमलाकर कदम, प्रभाकर कदम, जाजू शेठ, बाळासाहेब जाधव, बापूसाहेब गोरे, विनोद जाधव, मंजूरखॉ पठाण, शंभूराजे पवार, ओमराजे पवार, माधव बोराडे, डॉ.आश्विन खुरदळे, ज्ञानेश्वर चाटे महाराज, दिगंबर शेटे, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, उमाकांत उरगुंडे, मोहनराव गंगथडे, व्यंकट जाधव, सोमनाथ वाघमारे आदींनी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या कैलास निवासस्थानी येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
————————————————–