16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयविविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

विविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

*भाजपमुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा !*

: नाना पटोले

*राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष करण्यासाठी लातूर जिल्हा मोठे योगदान देईल!*

: अमित देशमुख

*निलंगा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश*

*लातूर जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश*

मुंबई, दि. ४ मार्च २०२२

  काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातही हा ओघ असाच राहिल. लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश घेवून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून भाजपमुक्तीचा हा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

  गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला यावेळी लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, आमदार राजेश राठोड, आमदार धिरज देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड किरण जाधव, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सरचिटणीस व लातूर जिल्हा प्रभारी जितेंद्र देहाडे, अभय साळुंके, सचिन दाताळ आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सत्तेत आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचे काम सुरु केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली असून आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले पाहिजे यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन करत सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

 *राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष करण्यासाठी 

*लातूर जिल्हा मोठे योगदान देईल!*

: अमित देशमुख

यावेळी बोलताना लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, स्व. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यात भक्कमपणे उभे केले. आज मोठ्या संख्येने भाजपासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्वजण तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यासाठी राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष करण्याकामी लातूर जिल्ह्याचा मोठा वाटा असेल. 

 लातूर जिल्हयात माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाभिमुख राजकारण आणि समाजकारण केले होते. आगामी काळात त्याच पध्दतीचे काम जिल्हयात होईल आणि काँग्रेस पक्षाला पुर्ववैभव प्राप्त करून दिले जाईल यातून राज्यात काँग्रेस प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ज्या पध्दतीने प्रयत्न करीत आहेत त्यास बळ मिळणार आहे त्यास बळ मिळणार आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मान आणि योग्य्‍ प्रकारची संधी देण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्री देशमुख यांनी दिले.    

  देशाच्या पातळीवर लातूर जिल्ह्याचा शिक्षणासह राजकारणात देखील एक वेगळा पॅटर्न असून या जिल्ह्याने सदैव माजी केद्रिंय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, लोकनेते विलासराव देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनावर जिल्ह्याच्या विकासाचा आलेख चढता राहीला आहे. येणाऱ्या काळात देखील जिल्ह्याचा विकास व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला अधिक यश मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध राहू असा विश्वास आपल्या मनोगतात प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.

  लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर, तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विशेषतः निलंगा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित तुकाराम माने, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष हमिद इब्राहिम शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चक्रधर शेळके, पंचायत समिती सदस्य रमेश सोनावणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वाती विक्रम जाधव, तनुजा पडसाळगे, निलंगा तालुका भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय सुधाकर सुभेदार, निलंगा येथील ज्येष्ठ भाजपा नेते आबासाहेब गोविंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलंगा विलास विनायक लोभे, अनुसुचित मोर्चा लातूरचे जिल्हाध्यक्ष अनिता सुधाकर रसाळ, निलंगा बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड सुनिल तुकाराम माने, निलंगा बार असोशिएशनचे सचिव प्रविण नरहरे, एमआयएम निलंगा अध्यक्ष मनजीब अब्दुल सौदागर, अनिल चव्हाण, उमाकांत प्रल्हाद सावंत, खुदबुद्दीन घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे  ॲड. मनोज आलमले, ॲड.प्रवीण नरहरे, ॲड.सुनील माने, राजेश्वर मोटे, दीपक जाधव, बालाजी देवकते, उमाकांत सावंत, खुदबुद्दीन घोरवाडे, युवराज घोगरे, विठ्ठल मुळे, विलास लोभे, शेषेराव श्रीमाळे, मनीषा बोळशेटटे, दतता लोभे, वामन जाधव, भानुदास वाडीकर, बालाजी शिंदे, रामलिंग पडसाळगे, इस्माईल शेख, प्रदीप पाटील, सोमनाथ लांडगे, दादाराव जाधव, मुजीब सौदागर, समंदर कादरी, इम्रान सय्यद, आवेज शेख, माधव राठोडे, नामदेव लोभे, रमेश शेळके, ज्ञानदेव लाभे, पंढरी सूर्यवंशी, सोमनाथ जाधव, बालाजी पांचाळ, ज्योतीराम जाभोळे, सागर बोळशेट्टी, शुभम जाधव, भानुदास कदम, शेखर पाटील, दत्ता माने, बाळू माने, गणेश माने, बिबीशन माने, राजू शिंदे, सहदेव जरे, शेषराव गंगथडे, शिवाजी माने, अमोल माने, तम्मा इटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. या सर्वांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख, मंत्री सुनील केदार, आमदार धीरज देशमुख यांनी अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

———————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]