18.3 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*विलास साखर कारखान्यास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार*

*विलास साखर कारखान्यास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार*

वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुटचे, मानाचे

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक

विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ला

बहादूर शेख यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार

लातूर प्रतिनिधी :  रविवार दि. १५ जानेवारी २०२३

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे गळीत हंगाम २०२१-२२ चे मानाचे राज्यस्तरीय पारितोषीके जाहीर झाले आहे. यामध्ये ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता पारीतोषिक पुरस्कार तोंडार ता.उदगीर येथील विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट २ ला जाहीर करण्यात आला आहे. या पारितोषीकामूळे सहकार आणि साखर कारखानदारीत विलास साखर कारखान्याचा दबदबा निर्माण झाला आहे. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणेकडून गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यानी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करून विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ची या पारीतोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे होणाऱ्या सोहळयात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक प्रदान करण्यात येणार आहे. 

मांजरा परिवारातील साखर कारखान्यामूळे लातूर तालुक्यातील उस गाळपाचा प्रश्न सुटला होता. परंतु जिल्हयातील उदगीर, जळकोट, देवणी या भागातील शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेवर गाळप व्हावे यासाठी विलास सहकारी साखर कारखाना लि., युनीट २ च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले आहेत. लातूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परिवाराचे उल्लेखनीय योगदान आहे. या परीवारातील तोंडार उदगीर येथील कारखान्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे. 

आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक

विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ ला वसंदादा शुगर इन्स्टियुट कडून उत्तर पूर्व विभागातील तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक प्रथम क्रमाकांचे मिळाले आहे. कारखान्याने गत गळीत हंगामात पूर्ण कार्यक्षमतेचा वापर केला, हंगामात पाण्याची बचत करून पाण्याचा पूर्नवापर केला, मागील दोन वर्षाच्या तुलनेत साखर उताऱ्यात ०.७७ टक्के वाढ केली, साखर उतारा १२.२० टक्के मिळवला, गाळप क्षमतेचा वापर १०६. ३७ टक्के केला, ऊसतोडणी वाहतुक यंत्रणेचा कार्यक्षमतेने वापर केला, हंगामात कारखाना बंद राहणार नाही यांची काळजी घेतली, या सर्व कामाची पडताळणी करून कारखान्याची या पारीतोषीकासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून निवड करण्यात आली आहे. या गळीत हंगाम  २०२१-२२ मध्ये ५,३७,०५५ मे. टन ऊसाचे गाळप होवून ६,५५,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले व. सरासरी साखर ऊतारा १२.२० टक्के मिळाला होता. साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात तांत्रीक कार्यक्षमता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करण्यात आले यामध्ये विलास कारखाना युनीट – २ ची कामगिरी सरस ठरल्याने तांत्रिक कार्यक्षमता पारितोषीक कारखान्यास देण्यात आले आहे.

हा पुरस्कार माजी मंत्री, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हा.चेअरमन रविद्र काळे, युनीट २ चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार, सर्व संचालक मंडळासह  स्वीकारणार आहेत. 

या पारितोषिकाने विलास कारखान्यास गौरविण्यात आले, याबददल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व संस्थापक आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी कारखान्याचे आधिकारी कर्मचारी वर्ग ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार तोडणी मंजूर व कंत्राटदार या सर्वाचे व्यवस्थापणाचे वतीने सर्वांचे अभिनंदन केले.

विलास साखर कारखाना युनीट २ चे शेतकरी

बहादूर शेख यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पारितोषीक

वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पूणे यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा राज्यस्तरीय ऊसभूषण पारितोषीक तोंडार ता. उदगीर येथील विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ चे ऊसउत्पादक शेतकरी बहादूर गुलाब शेख यांना मिळाला आहे. खोडवा ऊसउत्पादनात त्यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावीला असून त्यांनी ऊसजात को ८६०३२ चे हेंक्टरी २७५.४० मे. टन उसाचे उत्पादन घेतले आहे. या पारितोषिकाच्या निकषासाठी विलास सहकारी साखर कारखाना युनीट २ चे ९ ऊसउत्पादक पात्र झाले होते. यामध्ये सुरू उसगवड, पुर्वहंगामी उसलागवड व खोडवा उसलागवडसाठी प्रत्येकी ३ उसउत्पादकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ऊसउत्पादक शेतकरी बहादूर गुलाब शेख यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पारितोषीक मिळाले आहे. या कारखान्याच्या उसउत्पादकांना मिळणारा ४ था पूरस्कार आहे.

ऊसउत्पादक शेतकरी बहादूर गुलाब शेख यांना कारखानाच्या ऊस विकास व कृषी विभागाने उसलागवड, उसतोडणी व खोडवा व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जिवाणू खताचा वापर करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. त्यांचे उसक्षेत्र संपूर्ण ठिबक करण्यात आले होते ड्रोनव्दारे खते व औषधाची फवारणी करण्यात आली होती. कारखाना उसविकास योजनांचा त्यांना यासाठी उपयोग झाला असल्याचे कार्यकारी संचालक ए.आर.पवार व उसविकास अधिकारी एस.डी.बुलबूले यांनी सांगितले आहे.

—————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]