19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*विधानसभा निवडणुकीला एकदिलाने व एकजुटीने सामोरे जा -पावसकर*

*विधानसभा निवडणुकीला एकदिलाने व एकजुटीने सामोरे जा -पावसकर*

आगामी विधानसभा निवडणुकांना सर्व ताकदीनिशी सामोरे जावे

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे आवाहन

लातूर/प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीत भाजपा आघाडीने विजय प्राप्त केला असून पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत काही मतदारसंघामध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असून या पराभवाचे चिंतन आणि मंथन करत निवडणूकीत झालेल्या चुका दुरूस्त करून आगामी विधानसभा निवडणुकीला एकदिलाने व एकजुटीने व सर्व ताकदीनिशी सामोरे जावे असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर लोकसभेचे निरीक्षक विक्रम पावसकर यांनी केले.


प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीतील परिस्थितीचे आकलन व त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी लातूर येथे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे निरीक्षक म्हणून आलेले होते. त्यांच्या उपस्थितीत लातूर येथील इशान स्क्वेअर येथे मतदारसंघातील प्रत्येक विधानसभेच्या कोअर कमिटीसह प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी पावसकर बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी खा. सुनिल गायकवाड, प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा प्रभारी किरण पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांचीउपस्थिती होती. या बैठकीच्या सुरूवातीस देशाच्या पंतप्रधानपदी तिसºयांदा नरेंद्र मोदी विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी मांडला. या ठरावास जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्यासह महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे व शहर जिल्हाध्यक्षा रागिनी यादव यांनी अनुमोदन दिले.

यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात या ठरावास मान्यता दिली.
भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून राष्ट्र प्रथम हा संस्कार पक्षाने रुजविलेला असून या संस्काराच्या आधारे आणि गत दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर भारतीय जनता पक्ष नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेला असल्याचे विक्रम पावसकर यांनी सांगितले. जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करायाचा प्रामाणिक प्रयत्न करीत लोकहिताच्या अनेक योजना मोदी सरकारने राबविलेल्या होत्या. त्यामुळेच देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवली असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले. मात्र काही मतदारसंघात जनतेत संभ्रम निर्माण करणारा प्रचार करून काँग्रेस व इंडी आघाडीने असभ्य राजकारण केली असल्याची टीका पावसकर यांनी केली. खोटे बोल पण रेटून बोल असे करत लोकशाहीची थट्टा करण्याचे काम इंडी आघाडीने केले असल्याने काही मतदारसंघात भाजपाला पराभवास सामोरे जावे लागले आहे.
मात्र, या पराभवामुळे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा एकदिलाने, एकजुटीने व सर्व ताकदीनिशी आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जावे, असेआवाहन करून सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास या उक्तीप्रमाणे काम करावे असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर केंद्र व राज्य सरकारने केलेली लोकहिताची कामे व विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्याशी संपर्क साधल्यास विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुका जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन पावसकर यांनी केले.


यावेळी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची समिक्षा करून त्याची पुनरावृत्ती आगामी निवडणुकांमध्ये होणार नाही याची दक्षता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेआवाहन करून पक्षाची ध्येय धोरणे व केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी बूथरचना अधिक व्यापक व सक्षम करावी, असे सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोअर कमिटी सदस्य व पदाधिकाºयांशी वैयक्तिक चर्चा करतआगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय रणनिती असावी याबाबतची मते जाणून घेतली. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावाही त्यांच्याकडून घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]