शास्रज्ञांच्या शोधांचा आदर्श घेऊन विज्ञानाकडे डोळसपणे पहा – प्रसिद्ध लेखिका दिपा देशमुख
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प येथे संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रसिद्ध लेखीका दिपा देशमुख व वेधचे समन्वयक धनंजय कुलकर्णी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
लातूर-विद्यार्थ्यांना शालेय जीवनात कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीमत्त्वांची जवळून ओळख व्हावी या उद्देशाने ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात निमंत्रित केले जाते .
सोमवार दिनांक २७ जुन रोजी अशाच एका संवाद यात्रेचे आयोजन नरहरे लर्निंग होम येथे करण्यात आले होते . या संवादासाठी प्रसिद्ध लेखिका दिपा देशमुख , पुणे व वेध प्रकल्प समन्वयक धनंजय कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागतनेमकरण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना व अभंग गायन करुन उपस्थित पाहुण्यांची मने जिंकली.
वेध चे समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करत ज्ञानप्रकाश सारखी शाळा आपल्याला शालेय जीवनात मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली. पुस्तकाव्यतिरिक्त माहिती ची अनेक साधने आता उपलब्ध झाली असून त्या माहितीचे रूपांतर ज्ञानात करून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
प्रसिद्ध लेखिका दिपा देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत इतिहासातील महान शास्त्रज्ञ, त्यांचे शोध व त्यांचा जीवन प्रवास यावर सखोल माहिती दिली. ज्या मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेला वनस्पती सजीव असल्याचा सिध्दांत, लुई पाश्चर यांचा रेबीज लस तयार करण्याचा प्रवास, १०९३ शोध नावे करणारे थॉमस अल्व्हा एडिसन , टेस्ला , अलबर्ट आईनस्टाईन व नोबेल विजेत्या मेरी क्युरी व पेर क्युरी यांचे शोध व त्यांच्या जीवनात आलेले अनुभव याच्यावर प्रकाश टाकला व अशा महान शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळेच आपण निरोगी व प्रगत आयुष्य जगतो . त्यांचा आदर्श घेत विज्ञानाकडे डोळसपणे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थींनी केले. तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सतिश नरहरे सर यांनी केले व आभार भाग्यश्री हिप्परगे यांनी मानले.