परभणी ; दि.२५ (प्रतिनिधी ) – आपण पुस्तकातल्या समस्या सोडवतो पण जीवनातल्या समस्या सोडविण्याची कौशल्य आपणाकडे नसते म्हणून ज्ञान आणि कौशल्य मिळवून पुस्तकी ज्ञानावर अवलंबुन न राहता विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करुन स्वंयपूर्ण झाले पाहीजे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक डॉ. रणजीतसिंह डिसले यांनी केले.
शिवसेना परभणी विधानसभेच्या वतीने रविवार दिनांक 24 जुलै शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळावा पार पडला.यावेळी डॉ.डिसले बोलत होते.व्यासपिठावर आयोजक आमदार आमदार डॉ.राहुल पाटील जिल्हाधिकारी आचल गोयल , महिला आघाडी संपर्कप्रमुख ज्योतीताई ठाकरे, शिक्षण तज्ञ रवींद्र बनसोड,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे,शिवसेना सहसपंर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,शिक्षणाधिकारी आशा गरुड, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.डिसले म्हणाले,जीवनात कायम अभ्यासू राहा त्यामुळे तुम्ही कृतिशील राहता, जीवनात मार्क आणि मनी या दोन गोष्टींच्या मागे लागू नका कौशल्य विकसित करा. ज्ञान मिळवा मोठी स्वप्ने पहा आपली ध्येय निश्चित करून दिशा ठरवा यश मिळाल्यानंतर जीवनात अनेक मार्ग खुले होतात त्यातून ज्ञान मिळवा कारण यशापेक्षा ज्ञान महत्त्वाचे असते जगात ज्ञान असणाऱ्या लोकांनाच सन्मान मिळत असतो आपण पुस्तकातल्या समस्या सोडवतो पण जीवनातल्या समस्या सोडविण्याची कौशल्य आपणाकडे नसते म्हणून ज्ञान आणि कौशल्य मिळवून असा सल्ला त्यांनी दिला.पुर्वी खेळ खेळताना माणस एकत्रीत येत होती.परंतु सध्याच्या काळाता माणस एकत्र करणे अवघड झाले आहे.परंतु डॉ.राहुल पाटील यांच्यासारखे लोकप्रतिनिधी हजारो माणसाना एकत्र आणण्याचे कार्य करत आहेत.
गुणवंताच्या पाठीवर कौतुकाची थाप मारुन गुणवंताना उभारी देण्याचे काम डॉ.पाटील यांच्या हातुन होत असल्याने गुणवंत विद्यार्थी निश्चीत आपले ध्येय साध्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रास्तावीक करताना डॉ.पाटील म्हणाले,दरवर्षी शिवसेनेच्यावतीने गुणवंताचा सत्कार करण्यात येतो.परभणी ही जशी संताची,स्वातंत्र्यसैनिकांची भुमी आहे तशीच ती गुणवंता विद्यार्थ्यांची देखील आहे.परभणी येथील विद्यार्थी जगभरात विविध पदावर कार्यरत आहेत.परभणीत एक गुणवत्तेचा पॅटर्न तयार होत आहे.भविष्यात शिक्षण क्षेत्रात जे काही करता येईल त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे पाटील म्हणाले.कृषि विद्यापीठात सायन्स पार्कची उभारणी होत आहे.तसेच अद्यावत क्रीडा संकुल देखील तयार होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या,गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाच कौतुक केले पाहीजे.त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.तसेच भविष्यातील शिक्षणासाठी उत्साह येतो.विद्यार्थ्यांनी यश संपादन करायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवावे,ध्येय निश्चीत करुन वाटचाल करावे असा सल्ला दिला.

यावेळी रवींद्र बनसोडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील ध्येय निश्चित करूनच वाटचाल करा आई-वडिलांना सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र माना त्यांची सेवा करा असे मार्गदर्शन केले. यावेळी ज्योती ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 600 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक गजानन काकडे व प्रल्हाद देवडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गाडगे, सदाशिव देशमुख नंदू पाटील संदीप झाडे सुभाष जोंधळे ज्ञानेश्वर पवार अनिल डहाळे रवी पतंगे दिनेश बोबडे सोपान अवचार संग्राम जामकर अरविंद देशमुख सुशील कांबळे प्रशास ठाकूर तानाजी भोसले नवनीत पाचपोर बाळासाहेब राखे विशू डहाळे बाळराजे तळेकर अमोल गायकवाड वंदना कदम सुनिता कांबळे नंदिनी पानपट्टे रेणुका पवार मारुती तिथे संभानाथ काळे राहुल खटिंग ऋषी सावंत शुभम हाके गणेश मुळे मकरंद कुलकर्णी स्वप्निल भारती राहुल गायकवाड गोपाळ मोरे संतोष गायकवाड व असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले