दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत विभागात अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन.
लातूर.दि.३० दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत विभागात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत चालू आहे.मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडित झालेली परंपरा यावर्षी पुनः सुरू करण्यात आली.
प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या संगीत विभागात नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीची भावना दूर व्हावी व त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.हा कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन इयत्ता बारावीचे विद्यार्थी करतात.यातून विद्यार्थ्यांतील नेतृत्वगुण विकसित व्हावा,सभाधिटपणा यावा व व्यवहार्य चातुर्य यावे हा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य अनिलकुमार माळी हे उपस्थित होते तर पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे,संगीत विभागप्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी,सिनेट सदस्य डॉ. संदीपान जगदाळे,डॉ.गोपाळ बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर अधिराज जगदाळे, अनमोल कांबळे,गणेश माळी,ज्ञानेश्वर जाधवर,अनंत खलुले यांनी प्रार्थना गीत सादर केले.
याच कार्यक्रमात डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांची अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दयानंद कला महाविद्यालयाचा संगीत विभाग संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी काढले. तर संगीतातून व्यक्तिमत्व विकास होतो असे प्रतिपादन डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले.संगीत विभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती डॉ. संदीपान जगदाळे यांनी विशद केली.
या कार्यक्रमात कु.आर्या शिंपले,कु.यशश्री पाठक व कु.श्रद्धा गुरव यांनी मनोगत मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बरिदे याने केले,प्रास्ताविक अधिराज जगदाळे याने केले.पाहुण्यांचा परिचय कु.सई शिंदे हिने करून दिला तर कु.अंजली कराळे हिने आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित हजारे,प्रतीक भालेराव,कु.वैष्णवी कोरके,कु.रोहिणी लखादिवे, कु अमृता सूर्यवंशी,कु.दिव्या तोडेवाले यांनी परिश्रम घेतले.