28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा !*

*विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा !*

पुणे, कोल्हापूर, औरंगाबादनंतर आता “आयआयबी अकोल्याला दाखल”

लातूर : डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी केवळ ईच्छाचं नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यक असते. दरम्यान,
देशभरात सर्वाधिक डॉक्टर देणाऱ्या आयआयबी
इन्स्टिट्यूटने राज्यभर विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर घडविण्याचा विडा उचलत आपल्या शाखेचे जाळे विस्तारित केले आहे. नांदेड, लातूर येथे उज्ज्वल यशाचे शिखर गाठल्यानंतर पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबादनंतर विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हितार्थ अकोला येथे आयआयबी इन्स्टिटय़ूटने आपली नवीन शाखा स्थापन केली असून या शाखेमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा मिळणार आहे.

देशात आज असे एकही एम्स मेडिकल कॉलेज किंवा इतर कोणते नामांकित वैद्यकीय महाविद्यालय नाही जेथे आयआयबी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी शिक्षण घेत नाही, किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊन एक निष्णात डॉक्टर म्हणून बाहेर पडला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मागील तब्बल २३ वर्षांपासून आयआयबी इन्स्टिट्यूट शैक्षणिक क्षेत्रात देत असलेले अतुलनीय योगदान. आजमितीला आयआयबी इन्स्टिट्यूटच्या नांदेड, लातूर येथील ज्ञानशाखा अत्यंत नेत्रदीपक असा निकाल देत आहेत. मागील काळात विद्येचे माहेरघर असलेल्या
पुणे येथे नीट आणि जेईईच्या तयारीसाठी आयआयबी इन्स्टिट्यूटची शाखा स्थापन केली. मात्र, यावर न थांबता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर क्षेत्रात करियर घडविता यावे यासाठी अल्पावधीत कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे शाखा स्थापनेनंतर
विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हितार्थ अकोला येथे आयआयबी इन्स्टिटय़ूटने आपली नवीन शाखा स्थापन केली असून या शाखेमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर होण्याची योग्य दिशा मिळणार आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रमुख विभागांपैकी एक असलेल्या विदर्भात असलेल्या नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावतीत वाशीम, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मेडिकल-इंजिनिअरिंग करियर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट/जेईई ची तयारी करण्यासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे ।

वंचितांना मोफत शिक्षण

विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आयआयबीने अकोला येथे स्थापन केली असली तरी आयआयबी आणि विदर्भाचे नाते नवीन नाही. कारण आयआयबी मागील काही वर्षांपासून विदर्भातील गडचिरोली आणि परिसरातील आदिवासी समाजातील, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे. आता खुद्द आयआयबीची शाखाचं विदर्भात स्थापन झाल्यामुळे संपूर्ण विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]