28.3 C
Pune
Tuesday, January 7, 2025
Homeराजकीयविजयानंतर आमदार कराड यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

विजयानंतर आमदार कराड यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

गरीब स्वाभिमानी कार्यकर्ता विकला नाही
मतदाराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
विजयानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ. रमेशआप्पा कराड

लातूर दि.२५ – ( माध्यम वृत्तसेवा):–काँग्रेसवाल्यांनी लातूर ग्रामीण मतदार संघात पैशाचा पाऊस पडला मात्र माझा गरीब स्वाभिमानी कार्यकर्ता विकला गेला नाही. बहाद्दर मतदारांनी भ्रष्ट पैशाची मस्ती जिरवली असून मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. यापुढील काळात सहकारी साखर कारखाने शेतकऱ्याच्या मालकीचे करायचे आहेत असे सांगून लातूर ग्रामीण एक विकासाचे मॉडेल मतदारसंघ निर्माण करू अशी ग्वाही लातूर ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली.


लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात नवे परिवर्तन घडून आले. वर्षानुवर्ष पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले. भाजपाचे नेते रमेशआप्पा कराड यांचा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय घोषित होताच भाजपासह महायुतीतील कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी आ. कराड यांच्या लातूर येथील कौशल्या या निवासस्थानी रमेशआप्पांचे अभिनंदन करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक जण पुष्पहार घालून पेढे भरवून अभिनंदन करत होते. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष अनेक जण करत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रदीर्घ संघर्षानंतर आनंदाचे वातावरण दिसून येत होते. यावेळी निवासस्थाना बाहेर प्रचंड फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.


यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अँड बळवंतराव जाधव, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, फकीरा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा संजय शिंदे, शिवाजीराव केंद्रे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, दशरथ सरवदे, यांच्यासह भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. हजारोंच्या संख्येनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यासह नागरिकासमोर आपल्या भावना व्यक्त करताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गेल्या वीस – पंचवीस वर्षाच्या स्वप्नाची पूर्तता खऱ्या अर्थाने आज झाली असून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपाचे काम सुरू केले त्यांनी माझ्यावर लातूर ग्रामीण मतदार संघाची ज्या दिवशी जबाबदारी टाकली त्या दिवसापासून या मतदार संघाची सेवा करत आहे. वेळोवेळी स्वतःसाठी नव्हे तर गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला.
मागील काळात दोन वेळा पराभूत झालो मात्र कधीच खचून गेलो नाही ज्या दिवशी पराभव झाला. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कामात राहिलो. भ्रष्ट पैशाच्या जोरावर गेल्या निवडणुकीत मतदार संघ विकत घेण्याची पाप केले नसते तर पाच वर्षांपूर्वीच आपला विजय झाला असता असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, या वेळची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती मात्र जनतेने निवडणूक हातात घेतल्याने जनशक्तीचा विजय झाला. कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले आणि स्वाभिमानाची लढाई जिंकलो.


निवडणुकी दरम्यान प्रचंड पैशाचा पाऊस झाला तरीही माझा स्वाभिमानी गरीब कार्यकर्ता विकला गेला नाही. हे यश स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या कष्टाचे आणि मेहनतीचे आहे. लाडक्या बहिणींनी मोठा आशीर्वाद दिला. कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि त्यांनी केलेल्या कष्टातून कधीही उतराई होऊ शकत नाही. हा विजय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना समर्पित करत आहे. मतदार संघातील मतदारांनी काँग्रेस वाल्याची हुकूमशाही आणि एकाधिकारशाही मोडीत काढून नवे परिवर्तन घडवले जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि कार्यकर्त्यांची मान खाली जाईल असे वर्तन माझ्याकडून होणार नाही अशीही ग्वाही आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.


या विजयामुळे आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असून नम्रपणे जनतेच्या कायम संपर्कात राहून कामे करावीत. या पुढील काळात ग्रामपंचायत, सोसाट्यासह सर्व विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे, सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे करावयाचे आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात लातूर ग्रामीण मतदार संघ एक विकासाचा मॉडेल निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]