23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय*विक्रम काळे हे शिक्षकांचे निष्क्रिय आमदार - अपक्ष उमेदवार मनोज पाटील यांची...

*विक्रम काळे हे शिक्षकांचे निष्क्रिय आमदार – अपक्ष उमेदवार मनोज पाटील यांची टिका*


शिक्षकांच्या मागण्यांचा हार गळ्यात घालून मनोज पाटील यांचा प्रचार —.
लातूर ; ( प्रतिनिधी)

मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यात विक्रम काळे हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत , त्यामुळे त्याची निष्क्रियता हि शिक्षकांना अडचणीत आणणारी आहे ,अशी टीकामुख्याध्यापक व शिक्षण संस्था समन्वय संघाचे उमेदवार मनोज पाटील यांनी केली आहे . ते लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी के.पी. पाटील , वाल्मिक सुरवसे , राहुल कांबळे,संभाजी गजले ,जावेद शेख, अनिकेत भूपणकर यांची प्रमुख उपस्थिती होती .


पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मनोज पाटील म्हणाले कि , मराठवाडा शिक्षक मतदार संघात निवडून गेल्या नंतर आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांनी पक्षीय राजकारणाला जास्त महत्व दिलेले आहे . त्यांना शिक्षकांचे प्रतिनिधी होण्यापेक्षा मंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत. मी स्वतः शिक्षक असल्याने मला शिक्षकांच्या प्रश्नांची जवळून जाण आहे ,त्यामुळे शिक्षक मतदारांनी मला मतदान करावे असे आवाहन करतो ,विक्रम काळे हे त्यांच्या कारकिर्दीत अपयशी ठरले आहेत.


विना अनुदानीत शाळांना अनुदान द्या , जुनी पेन्शन योजना लागू करा , मराठी माध्यमांच्या शाळा वाचवा अश्या अनेक मागण्यांचा फलक लिहलेला हार गळ्यात घालून मनोज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात जाऊन त्यांनी शिक्षक मतदारांच्या भेटी घेतल्या . औरंगाबाद येथे शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात त्यांनाही मारहाण झाली होती . या मोर्चासाठी ज्या प्रमुख १२ शिक्षकांना मारहाण झाली होती त्यात मनोज पाटील यांचाही समावेश होता .याची जाणीवही प्रचारा दरम्यान ते शिक्षक मतदारांना करून देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन त्या पूर्ण करण्यासाठीच आपण उमेदवारी अर्ज भरला असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले आहे . मनोज पाटील हे शिक्षक , मुख्याध्यापक व शिक्षण संस्था समन्वय संघाचे अधिकृत उमेदवार आहेत . औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील मारोळा येथील ४० टक्के अनुदानित असलेल्या मोहटादेवी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]