औसा – औसा तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात आ. अभिमन्यू पवार यांनी दि.२८ जून रोजी औसा तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.या बैठकीत प्रामुख्याने महावितरण,आरोग्य, कृषी,जलसंधारण, जलजीवन मिशन, मनरेगा अंतर्गत योजनेचा आढावा घेत काही महत्वपूर्ण सूचना संबंधित विभागाला दिल्या.
या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब लालासाहेब कांबळे, दत्ता कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश पाटील, औसा तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे,भुमि अभिलेख उपअधीक्षक हेमंत निकाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर.शेख, महावितरण अभियंता जाधव, वनविभागचे अधिकारी तुकाराम चिल्ले, सामाजिक वनविभागचे सुदाम मुंडे,आदी उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी वाकलेले पोल, झोळ झालेल्या विदयुत तार व उघड्या पडलेल्या रोहित्री यावर दुरुस्ती संदर्भात मोहीम राबवून हि कामे करावीत. घरावरून गेलेल्या विदयुत तार सुरक्षित जागेवरून स्थलांतरित करण्यात यावे. माळूंब्रा (ता.औसा) येथील मंजुर असलेल्या वीज वितरण उपकेंद्रासाठी जमीन संपादित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्या.जलजीवन मिशन अंतर्गत अपुर्ण कामे प्राधान्याने पुर्ण करावीत.जलसंधारणची सीनाबा कामे प्रस्तावित करण्यात यावेत वनविभागाला हस्तांतरित केलेल्या जमिनीतून शेतीला जाणाऱ्या नकाशावरील व वहीवट रस्ते खुले करून देण्यासाठी या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी वनविभागाला सूचना दिल्या.केंद्रीय आरोग्य विभाग एनआरएच अंतर्गत औसा शहरात मंजुर असलेले शासकीय रुग्णालय त्वरित करण्यात यावे.संगायो, इंगायो अंतर्गत वार्षिक उत्पन्नाचे दाखले देणे संदर्भात गावनिहाय शिबीराचे आयोजन करून यामध्ये नवीन लाभार्थ्यांचे अर्ज भरणे, भुकंपग्रस्त प्रमाणपत्र, शिधापत्रिका देणे संदर्भात कामे करुन घ्यावीत जेणेकरुन लोकांची गैरसोय होणार नाही.असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी ज्यांनी मनरेगातून फळबाग लागवड केली आहे. आशा शेतकऱ्यांचे जनावरांचे गोटे योजनेसाठी अर्ज घेवून त्यांना गोटे देण्यात यावेत.यासह शेतरस्ते कामे झालेल्या शेतरस्त्यांचे दुतर्फा वृक्षलागवड करण्याच्या सूचना यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी दिल्या.
यावेळी शेतरस्ते, फळबाग लागवड, शेततळे, गोटे आदी योजनेच्या कामाचा आढावा या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी घेतला.यावेळी वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कन्हेरी व नदीहत्तरगा येथील शेतकरी याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आले. या आढावा बैठकीत उपस्थित लोकांच्या तक्रारी अर्ज स्वीकारून त्या निकाली काढण्याच्या सूचना प्रशासनाला आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी दिल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.