मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या
योजनांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाची करावीत
संपूर्ण गाव भागाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
लातूर शहरातील पटेल चौक येथे आमदार स्थानिक विकास निधीतून
तीन कोटी 42 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
- गावभागातील सर्व पुरातन वास्तू, विहिरी, बारव यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा
- गावभागातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे याचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून सादर करावा
- गावभागातील पंडित जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या ठिकाणी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे काम काही दिवसात सुरू होईल.
लातूर प्रतिनिधी : दि. २८ मार्च २०२२ :
लातूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या या सर्वच योजनांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाची करावीत तसेच एकंदरीत संपूर्ण गाव भागाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा यासाठी शासनाच्या वतीने विशेष निधी मंजूर करून दिला जाईल असे आश्वासन याप्रसंगी बोलताना पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. २७ मार्च रोजी सायंकाळी आमदार स्थानिक विकास निधीमधून लातूर शहरात राबवण्यात येत असलेल्या ३ कोटी ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध योजनांचा शुभारंभ गावभागातील पटेल चौक येथे करण्यात आला.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल ,ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, नगरसेविका सपना किसवे,मीनाताई गोरोबा लोखंडे,हकीम शेख, चंद्रकांत धायगुडे शाहरुख पटेल, गोरोबा लोखंडे,प्रवीण सूर्यवंशी, एडवोकेट देविदास बोरूळे पाटील, नगरसेवक सचिन बंडापले,विजयकुमार साबदे, कैलास कांबळे,आसिफ बागवान, युनुस मोमिन, गौरव काथवटे, इम्रान सय्यद, रवीशंकर जाधव, जीवन सुरवसे, कलीम शेख ,प्रा. प्रवीण कांबळे ,इसरार पठाण, दगड आप्पा मिटकरी ,एडवोकेट परवेज पठाण ,शरद देशमुख, हनुमंत पवार, राजकुमार माने, व्यंकटेश पुरी, पंडीत कावळे, अब्दुल्ला शेख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, मागील निवडणुकीत लातूर मनपात भाजपला काठावर बहुमत मिळाले काँग्रेसने मतदारांचा कौल स्वीकारून भाजपला सत्ता स्थापन करू दिली परंतु त्यांनी काहीच काम केले नाही. गाव भागाने सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासला आहे, गावभागातील पुरातत्व मंदिर विकासाचा आराखडा तयार करावा त्यास सांस्कृतिक कार्य विभागाकडून याच वर्षी निधी प्राप्त करून देऊ अशी ग्वाही यावेळी दिली. तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या या सर्वच योजनांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाची करावीत असे निर्देशही याप्रसंगी दिले. शहराच्या गावभागातील सर्व पुरातन वास्तू, विहिरी, बारव यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा त्यासाठी माझ्याकडे असलेल्या पुरातत्व विभागाकडून तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल.
गावभागातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे याचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून सादर करावा त्यासाठी वेगवेगळ्या योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. गावभागातील पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन खूप जुनी झाली असून ती संपूर्ण बदलण्याची योजना राबवण्यात येईल. पर्यटन विभागामार्फत शहरातील हजरत सुरत शहावली सावली परिसरात सुरू असलेले काम निधीअभावी रखडले होते आता त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ते तातडीने काम सुरु करण्यात येईल. गावभागातील पंडित जवाहरलाल नेहरू रुग्णालयाच्या ठिकाणी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा असलेले अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे काम काही दिवसात सुरू होईल. एकंदरीत संपूर्ण गाव भागाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा यासाठी शासनाच्या वतीने विशेष निधी मंजूर करून दिला जाईल असे आश्वासन याप्रसंगी पालकमंत्री ना. देशमुख यांनी बोलताना दिले. योवळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तुळजापूर-लातूर-अहमदपूर या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी प्रास्ताविक करून करण्यात येत असलेल्या कामांची सविस्तर उपस्थितांना माहिती दिली या प्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गोरोबा लोखंडे, ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुज्जमील शेख यांनी केले तर शेवटी आभार युवक काँग्रेसचे विष्णू धायगुडे यांनी मानले.
————-