- अमित दातार, डोंबिवली
मराठवाडा, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, दुपारी सव्वाबाराची वेळ.. बाहेर ऊन मी म्हणत होतं. उन्हाने होणारी अंगाची काहीली अनुभवत प्रवास सुरू होता. शहरातील दाटीची वस्ती मागे पडली आणि मुख्य रस्त्याच्या उजव्या कडेला एका छोट्याश्या गल्लीवजा रस्त्यावर शिकलगार वस्तीतील पत्र्याची घरं दिसू लागली. बाहेर एक केसांचा बुचडा बांधलेला तरुण पुरुष, दोन तीन महिला लोखंडी साहित्य घेऊन ठाकठोक करत होते. रस्त्यावर केसांना मळके फडके बांधलेली शीख वाटावीत अशी मुलं खेळत होती. आमची गाडी बघताच एऽऽ दादा आया, दादा आया म्हणून एकच गलका उठला आणि आजूबाजूची सुमारे वीस पंचवीस मुलं मुली आमच्या गाडीमागे धावू लागली. गाडी थांबताच पोरं अमच्याभोवती जमा झाली. बरोबर आणलेले चॉकोबार आइस्क्रीम देताच मुलं त्याचा मजेने आनंद घेऊ लागली. माझं आणि दादाचं बोलणं सुरु झालं. ही होती अंबाजोगाई मधील शिकलगार वस्ती.
प्रसाद दादा सांगू लागला.. सतराव्या शतकात जेव्हा पंजाबातून शिखांचे गुरू गोविंदसिंह हे महाराष्ट्रात नांदेडला आले तेव्हा त्यांच्याबरोबर आलेली अनेक शीख मंडळी महाराष्ट्रातच स्थिरावली. सैन्याला शस्त्र तयार करून पुरवठा करणारी ही शीख मंडळी म्हणजेच शिकलगार, जी मराठवाड्यात नंतर सर्वदूर पसरली. पारंपरिक शस्त्रांचा जमाना गेल्यावर ही मंडळी आजही आपला धातूकामाचा व्यवसाय करतात. शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य, कायमस्वरूपी निवास व चरितार्थासाठी साधन नसणे अशा अनेक समस्या असलेला हा समाज आजही गावकुसाबाहेर राहतो.
(मुंबई, ठाणे, डोंबिवली व पुण्यातील शहरी नागरिक प्रबोधक परिवार / विवेकवाडी परिवार मार्फत ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाईतील प्रसाद दादा चिक्षे यांनी सुरू केलेल्या जलसंधारण चळवळीत २०१५ पासून सहभागी होत आहेत. पाण्याचं काम करतानाच करोना उद्भवला आणि पाण्याचं काम तात्पुरतं थांबलं. पण त्याच वेळी येथील भटक्या विमुक्त वस्त्यांवरील नागरिकांची अन्न पाण्याची सोय करतानाच शिकलगार वस्ती आणि यासारख्याच पारधी वस्ती, फकीर वस्ती, वडार वस्ती, आंबेडकर वस्ती अशा अजून चार वस्त्यांवरील मुलांच्या संपर्कात आपण आलो. मुलांना शाळा व्यतिरिक्त पूरक शिक्षण देत गावकुसाबाहेर राहणाऱ्या या समाजातील पुढील पिढीला माणसात आणण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.)
दादा सांगत होता.. ‘पांढरपेशा शिकलेला समाज आपल्याच अशिक्षित समाजबांधवांना परके मानतो’. काही भांडण तंटा होऊन वस्तीवरील अनेक पुरुष मंडळी खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात गेली. आधीच उल्हास, त्यात हा फाल्गुन मास.. गुन्हेगारांची मुले म्हणून या पोरांकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोनच बदलला असावा. शाळा बंद पडताच शिक्षणाची कोणतीच सोय उपलब्ध नव्हती. दिवसभर उनाडक्या करणे व मिळेल ते खाणे एवढाच उद्योग. प्रबोधिनी कार्यकर्त्यांनी वस्तीवरच रस्त्याकडेला मुलांची ही शाळा सुरू केली पण सुरवातीला मुलं येथे फिरकेचनात. कारण एका जागी बसण्याची सवयच नाही. मग खेळ, चित्रकला, हस्तकला, गोष्टी अशा अनेक प्रयोगातून या मुलांशी दोस्ती झाली आणि मुलं दादा आला म्हणल्यावर शाळेकडे धावू लागली. आता पूरक शिक्षणाबरोबरच मुलं आकडेमोड, लिखाण आणि अभ्यास पण छान आवडीने करतात. वस्तीतील मोठ्या मुलींकडे असलेले काच व शोभेच्या वस्तू बनवण्याचे कसब ध्यानी घेऊन प्रबोधिनी कार्यकर्त्यांनी त्यांना साहित्य विकत आणणे, अजून वेगवेगळ्या प्रकारे वस्तू बनविणे, त्या बाजारात जाऊन विकणे याचेही प्रशिक्षण दिले. (वस्तीवरील छोटी लक्ष्मी विक्री कौशल्यात खूपच तरबेज आहे. आज ती मुख्य रस्त्यावर गॉगल विकण्याचा व्यवसाय करते). आज ह्या मुली आपल्या कुटुंबाला थोडाफार हातभार लावीत आहेत.
पाण्याचे काम करतानाच आपल्याशी जोडला गेलेला निमला गावचा महादेव नरवटे हा पंचविशीत तरुण या वस्ती शाळेची जबाबदारी सांभाळीत आहे. पुढील कामासाठी जायचे असल्याने प्रसाद दादाने मुलांना निरोप दिला आणि नकळत आजच्या तासाची जबाबदारी मी घेतली. सुरवातीला बरोबर आणेलेले रंगवायचे चित्रांचे कागद, खडू देत मुलं झाडाखाली चित्रकला करण्यात रमली. हळूच गणिताचे वजाबाकी असलेले कागद बाहेर काढले. मुलांनी तो अभ्यास देखील मजेत करायला सुरुवात केली. प्रत्येकाला त्यांची गणिते आज महादेव दादा ऐवजी मीच तपासायला हवे होते.
‘दादा, ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तो हमे आता है, अभी कोई नया सिखाओ.. चौथीतील कर्तार सिंह, कुलदीप, संदीप सिंह आणि सिमरन कौर सांगत होते. त्यांचा तो अभ्यासातील उत्साह पाहून छान वाटले. खेळ कला या माध्यमातून मुलांचा नेहमीच्या अभ्यासातील रस देखील वाढतो असे ऐकले होते त्याचा प्रत्यय आला.
अभ्यास संपल्यावर, झूलझूल झंडा झूल, ध्वजयुद्ध असे मुलांचे खेळ घेताना त्यांच्यात रमून गेलो. परत निघताना प्रत्येकाला मी त्यांचा हात हातात घ्यावा, शाबासकी द्यावी असे वाटत होते. छोटा गोपालसिंह सारखा माझा हात धरून होता. (लहान मुलांना स्पर्शाची आणि त्यातून मिळणाऱ्या सुरक्षिततेची भूक असते हे वाचले होते. या छोट्या प्रसंगातून त्याचाही अनुभव आला.).
आज रामनवमी (१० एप्रिल २२) निमित्त अभ्यासाला सुट्टी देऊन रामाची गोष्ट, खेळ, गीत असं नियोजन करून महादेव दादा बरोबर पुन्हा वस्तीवर गेलो. कुस्ती, डुक्कर मुसंडी, कोंबड्यांची झुंज, तळ्यात मळ्यात असे भरपूर खेळ खेळून दमल्यावर सेतुबंधन, खारीची रामाला मदत अशा काही गोष्टी सांगत रामनवमी साजरी झाली. “हो, जाओ तय्यार साथियो” हे जोषपूर्ण गीत घेऊन आजच्या वस्तीशाळा वर्गाची सांगता झाली.
निघताना पाच वर्षांचा लहानगा गोपालसिंह जवळ आला आणि त्याच्याकडील छोटे कृपाण (शिखांचा चाकू) मला दाखवून म्हणाला, ‘दादा ये देखो मेरे पास हथियार है, कीसिको भी खल्ल्यास कर देगा’.. त्याच्या त्या धैर्याची प्रशंसा करावी की एवढ्या लहान वयात त्याच्या तोंडची ही भाषा बदलावी.. क्षणभर काहीच कळले नाही. त्याच्या दुर्दैवाने आज त्याच्या समोर, त्याच्याच वस्तीतील खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या कुणाचा आदर्श आज त्याच्या समोर आहे. पण त्याजागी शूर, न्यायी प्रभू रामचंद्र, गुरू गोविंदसिंह किंवा शिवाजी महाराजांचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांचीच ही नैतिक जबाबदारी आहे असे वाटले. निदान शहरी, सुशिक्षित लोकांनी अशा अनेक गोपाल सिंहांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची नितांत गरज आहे असे वाटले. त्यानुसार अजूनही बरेच काम करावे लागणार आहे. एक ना एक दिवस असा नक्की उजाडेल जेव्हा हे गावकुसाबाहेर राहणारे आपलेच बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात नक्कीच येतील.
की घेतले न हे व्रत अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ।।
वस्ती शाळेचा हा अनुभव माझ्यासाठी डोळे उघडणारा आणि विलक्षण ऊर्जा देणारा ठरला हे निश्चित !
(संपर्कासाठी भ्रमणध्वनी: श्री. प्रसाद चिक्षे, 8208438600, अंबाजोगाई)
ता. क. : वस्तीशाळेचा अनुभव घेऊन यावर्षीच्या पाण्याच्या कामाचा शुभारंभ देखील झाला. अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव गावातील माळी गुरुजी, अंकुश शिंदे यांच्या अमंत्रणावरून गावाला भेट दिली. गावातील नदीवर असलेला बांध यवर्षी पावसात फुटला. त्याचे काम करायचे त्यांनी योजिले आहे. गावकऱ्यांनी पन्नास टक्के म्हणजे पोकलेन मशीन च्या डिझेलचा खर्च दिल्यास या गावात आठवडाभर काम करता येईल. शिवाय तालुक्यातील पैठण आणि अजून एका गावात देखील नदीपात्र रुंदी/खोलीकरण करायचे योजिले आहे.
अमित विनायक दातार
डोंबिवली
प्रबोधक परिवार
१० एप्रिल २०२२ (राम नवमी)
वस्तीशाळा, एक ऊर्जा देणारा अनुभव