18.4 C
Pune
Wednesday, December 25, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*“वसुधैव कुटुंबकमसाठी” हजारोच्या संख्येने सोलापूरकरांनी केला योग*

*“वसुधैव कुटुंबकमसाठी” हजारोच्या संख्येने सोलापूरकरांनी केला योग*



प्राचीन भारतीय योग शास्त्राला
दैनंदिन जीवनाचा भाग बनवा
प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे आवाहन
◆खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन◆
●केंद्रीय संचार ब्यूरो जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे, समन्वय समितीच्या वतीने योग दिन साजरा

सोलापूर, दि. २१: योग हा ध्यान आणि व्यायामापुरतता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे. भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जिवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज येथे नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले.


सोलापूरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूर, जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग्य समन्वय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे बोलत होते. वसुधैव कुटुंबकमसाठी योग ही यावर्षीची योग दिनाची संकल्पना आहे.


खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनने उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थिताना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक नितीन धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, महाव्यवस्थापक विनोद तावरे, ज्येष्ठ संपादक अभय दिवाणजी, ह.दे.प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कांबळे, योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा, मुख्य समन्वयक सुधा अळळीमोरे, एन.सी.सी. बटालियन 38 चे सुभेदार मेजर अरुणकुमार ठाकूर, अजितकुमार, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते.


यावेळी प्रास्ताविकामध्ये श्री चव्हाण म्हणाले, वसुधैव कुटुंबकम साठी योग ही यावर्षी योग दिनाची संकल्पना आहे. जी२० ची भारत अध्यक्षता करत आहे. यावेळी पंतप्रधानाच्या उपस्थितीमध्ये युनोमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र मध्ये प्रथमच शहरातील सर्व योग संस्थानी एकत्रितपणे हजारोंच्या संख्येने योग दिन उत्साहात साजरा करत असल्याचे सांगितले.
मुख्य समन्वयक अळळीमोरे म्हणाल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तीन महिन्यापासून पतंजली व योग समन्वय समितीच्या वतीने प्रशिक्षित योग शिक्षक तयार केले असून त्यांनी आज आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल प्रमाणे जिल्हाभर योग महोत्सवामध्ये सहभागी झाले असून जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने लोक योग करत आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो याचे योग्य नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एन एन सी ३८ बटालियनची विद्यार्थींनी अमृता गुंफेकर ने म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून उपस्थितांची मने जिंकली. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सुरुवातीला जितेंद्र महामुनी आणि पुष्कराज गोयल यांनी शंखध्वनी करून योगाभ्यासाची सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थेच्यावतीने दमयंती मेथे यांनी शिथिली करण्याचे व्यायाम घेतले. योग साधना मंडळाच्या वतीने रोहिणी उपळाईकर यांनी उभी आसने घेतली व योग सेवा मंडळाच्या वतीने साधना पाये यांनी बैठे व पोटावरील झोपून करावयाची आसने घेतली. विवेकानंद केंद्राच्या वतीने दिपाली कुलकर्णी यांनी पाठीवरील योगासने घेतली. पतंजली योग पिठाच्या वतीने सुजाता सुतार यांनी प्राणायाम घेतले. गीता परिवाराच्या वतीने श्रीमती जाधव यांनी ध्यान धारणा घेतली.


यावेळी घेण्यात आलेल्या योगगुरू स्पर्धेतील नितीन मोरे, रोहिणी उपळाईकर, साधना पाये आणि वीणा नाईक यांना उपस्थितांच्या हस्ते योगगुरू म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी केले. अंबादास यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सोलापूर शहरातील पोलीस आयुक्तालयाचे हवालदार श्री ठोसर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथकाने अतिशय सुरेख देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच योग संचालनाच्या वेळी धून वाजवून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले.


सदरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहा पासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती. यावेळी पतंजली योगपीठाचे रघुनंदन भुतडा, प्रभाकर जाधव, योग असोसिएशनचे डी एम वेदपाठक, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापूरे, डॉ शोभा शहा, भारतीय योग संस्‍थाचे दत्तात्रय चिवडशेट्टी, राजशेखर लशमेश्वर, योग सेवा मंडळाचे सुनील आळंद, संतोष सासवडे, योग साधना मंडळाचे नागनाथ पाटील, रमेश सोनी, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योगच्या संगीता जाधव, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट प्रमोद पाटील, भारत स्‍काउट गाईडचे श्रीधर मोरे, अनुसया सिरसाठ, एन.सी.सी. बटालियन 38 चे सुभेदार अण्णाराव वाघमारे, सुभेदार रामचंद्र, हवालदार मनीषकुमार आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक, क्रीडा संस्था, महाविद्यालये, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


*
योगाच्‍या शास्‍त्रीय माहितीसाठी मल्‍टीमिडीया चित्र प्रदर्शन उपयुक्‍त.
महानगरपालिका आयुक्‍त शीतल तेली-उगले यांचे प्रतिपादन
आंतरराष्ट्रीय योग दिनी केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम

सोलापूर दि. २१. आनंदी आणि आरोग्‍यमय जिवनासाठी नियमित योगासने करणे आवश्‍यक आहे. आरोग्‍य हीच आपली धनसंपदा आहे. आंतरराष्‍ट्रीय योग दिवस हा आरोग्‍याची काळजी घेणेचे स्‍मरण करुन देतो. योगाच्‍या शास्‍त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्‍युरोचे मल्‍टीमिडिया प्रदर्शन अत्‍यंत उपयुक्‍त आहे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्‍त शीतल तेली उगले यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो आणि जिल्‍हा व पोलिस प्रशासन यांच्‍यावतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्‍या मुळे सभागृहात मल्‍टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी आयुक्‍त तेली उगले प्रमुख पाहूणे म्‍हणून बोलत होत्‍या.
मंचावर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, प्रभारी जिल्‍हाधिकारी तुषार ठोंबरे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक नितीन धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा, मुख्य समन्वयक सुधा अळळीमोरे, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके, योग साधना मंडळाच्‍या रोहिणी उपळाईकर आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते.
आयुक्‍त उगले म्‍हणाल्‍या, यावर्षी आंतरराष्‍ट्रीय योग दिनाची वसुधैव कुटूबकमसाठी योग ही संकल्‍पना आहे. आपले कुटूंब हे संपूर्ण पृथ्‍वी आहे. आपण या सगळया कुटूंबाची काळजी घेतली पाहिजे. सातसमुद्रापार आज युनोमध्‍ये भारताचे पंतप्रधान योगाचे नेतृत्‍व करत आहेत. याचा सर्वांना अभिमान आहे. योग आजच्‍या दिनापुरता मर्यादित न राहता सर्वकाळ निरंतर करावा. असेही आवाहन त्‍यांनी केले.


यावेळी पोलिस आयुक्‍त माने म्‍हणाले, केंद्रीय संचार ब्‍युरोने मल्‍टीमिडिया चित्रप्रदर्शनाच्या माध्‍यमातुन लोकांना आरोग्‍याबाबत दक्ष केले आहे. त्‍याचा सर्वांनी लाभ घ्‍यावा.
ज्‍येष्‍ठ योग गुरु भुतडा यांनी मल्‍टीमिडिया प्रदर्शन हे सर्वांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असून नेमकपणे माहिती देणारे दालन आहे. याचा सर्वांनी लाभ घ्‍यावा. असेही आवाहन त्‍यांनी केले.
श्री. चव्‍हाण म्‍हणाले, सामान्‍य लोकांना योगाबद्दल माहिती व्‍हावी यासाठी मल्‍टीमिडियाच्‍या माध्‍यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले. शहरातील शालेय विदयार्थी महाविदयलयीन युवक व ज्‍येष्‍ठ नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दयावी असे आवाहन केले. हे प्रदर्शन भारतीय प्राचीन योगाची माहिती देणारे आहे. यामध्‍ये प्रार्थना, पूरक हालचाली मानेच्‍या, योगासने उभी, बैठक, पाटीवरील, पोटावरील, प्राणायम, ध्‍यान आदीबाबत माहिती मिळणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असेल. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]