लातूर/प्रतिनिधी:
लातूर विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रावसाहेब लकडे तर व्हाईस चेअरमन पदी विष्णू खंदाडे यांची निवड करण्यात आली.
कांही दिवसांपूर्वी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात लातूर विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चेअरमन पदासाठी रावसाहेब लकडे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी विष्णू खंदाडे यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन रावसाहेब लकडे व व्हाईस चेअरमन विष्णू खंदाडे यांनी माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महापौर तथा सोसायटीचे संचालक विक्रांत गोजमगुंडे यांची यावेळी उपस्थिती होती. गोजमगुंडे परिवाराच्या वतीने यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक राजाभाऊ मोरे, गोविंदराव डुरे पाटील, सत्यनारायण पाटील, ॲड. विकास सुळ, व्यंकटराव रणखांब, भुजंग पाटील, फुलचंद धडे, दगडूसाहेब भारती, दत्तात्रय आर्वीकर, विक्रम जगन्नाथ सुरवसे पाटील, पवन राम थोरमोटे पाटील, चेतन कोल्हे आदी उपस्थित होते.