बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता
प्रत्येक निवडणूक जिंकण्याच्या जिददीने
काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कामाला लागावे
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट २०२३:
देशातील सत्ताधाऱ्यांची मनमानी आणि एकाधिकारशाहीला जनता आता कंटाळली असून विचारधारेवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाबददल आपूलकीची भावना वाढली आहे. या बदलत्या परिस्थितीची जाणीव ठेऊन पक्षपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकाधिक लोकाभिमुख होऊन पक्ष संघटना मजबूत करावी. येणारी प्रत्येक निवडणूक जिकण्याच्या जीददीने कामाल लागावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत आज या मतदारसंघातील प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची व्यापक आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आमदार देशमुख बोलत होते.
या आढावा बैठकीस माजी आमदार त्र्यंबक भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर लोकसभा काँग्रेस पक्ष सहनिरीक्षक डॉ जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे, सरचिटणीस मोईज शेख, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रा.डॉ.स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सपना किसवे, उषा कांबळे, सचिव, बाबासाहेब गायकवाड, एकनाथ पाटील, व्यकटेश पूरी, प्रविण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले की, वाढती महागाई, बेरोजगारी आणि सत्ता मिळवण्यासाठी आस्तीवात येत असलेल्या तत्वहीन आघाडींना राज्यातील आणि देशातील सामान्य जनता वैतागली आहे. या जनतेला मध्यममार्गाने वाटचाल करणारा काँग्रेस पक्ष पून्हा जवळचा वाटू लागला आहे. या परिस्थितीत पक्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रीय होणे गरजेचे आहे. सरकार बददल असलेली जनतेची नाराजी मतपेटी पर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करण्याची मानसीक तयारी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी करावी असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले आहे.
लातूर मतदारसंघात काँग्रेसचा
खासदार निवडून येणे अवघड नाही
आमदार संग्राम थोपटे
लोकसभा निवडणूकी नंतर झालेल्या निवडणूकीत विधानसभा तसेच स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्याच बरोबर राज्यातील आणि केंद्रातील सरकार बददल जनतेच्या मनात सदया मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. या एंकदरीत परिस्थितीचा विचार करता लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडूण येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे प्रतिपादन पक्षनिरीक्षक तथा आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी केले.
लातूर जिल्हयाने आजवर राज्याला आणि देशाला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे हा जिल्हा काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळखला जात आहे. जिल्हयातील पक्षाचे हे वैभव पूढे कायम राखण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहनही आमदार थोपटे यांनी केले.
काँग्रेस पदाधिकारी यांनी यावेळी आढावा सादर केला
लातूर शहर विधानसभा मतदार संघ आढावा बैठकीत लातूर शहर जिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, स्मिता खानापुरे, लक्ष्मण कांबळे, इमरान सय्यद, प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, विकास कांबळे, अंगद गायकवाड, कैलास कांबळे, संजय पाटील खंडापूरकर, पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार जाधव, प्राध्यापक संजय जगताप, नागसेन कामेगावकर, शरद देशमुख, अथरुद्दीन काझी यांनी मनोगत व्यक्त करून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे जे उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असून त्यासाठी आम्ही काम करू असे सांगितले.
यांनतर निलंगा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीत निलंगा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, भगवान पाटील, सोनू डगवाले, अजित माने, अरविंद भातांबरे दयानंद चोपणे, पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ आदींनी मनोगत व्यक्त करून काँग्रेस पक्षाने स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्याला संधी द्यावी अशी विनंती केली. अहमदपूर विधानसभा मतदार संघातील आढावा बैठकीत अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश कदम, विलास पाटील,एन.आर.पाटील, हेमंत पाटील, चंद्रकांत मददे, संजय पवार, शिवाजी जंगपले, निलेश देशमुख, खंडेराव शेवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील बैठकीत लोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद नामदेव पवार, बालाजी पंडागळे, शहाजी नळगिरे, सोनू संगेवार यांनी माहीती दिली. उदगीर जळकोट विधानसभा मतदारसं घाच्या बैठकीत उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, मारुती पांडे, विजय निटूरे, महबूब शेख, दत्ता सुरनार, महेश धुळशेट्टी, कुणाल बागबंदे, मेहताब बेग यांनी मनोगत केले.
शेकडो कार्यकर्ते काँग्रेस पक्षात दाखल
वंचित विकास आघाडीचे स्टार प्रचारक तथा सावता परिषद युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष एडवोकेट गोपाळ बुरबुरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी करुणा शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात लातूर लोकसभा काँग्रेस पक्ष निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच निलंगा येथील काँग्रेस कार्यकर्ते चक्रधर शेळके यांना काँग्रेस प्रशिक्षक सेल लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी चक्रधर शेळके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बैठकीस लातूर लोकसभा मतदार संघातील लातूर जिल्हा व लोहा कंधार तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, शहर / जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, एनएसयुआय, सोशल मिडिया इंटक, विलासराव देशमुख युवा मंच, रोजगार व स्वयंरोजगार विभाग ग्राहक संरक्षण विभाग, असंघटित कामगार विभाग आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, निमंत्रीत पदाधिकारी आदी उपस्थित होते.
———-