मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव
लातूर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने स्पर्धा
लातूर;दि.१२( वृत्तसेवा ) मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सक्रिय सहभाग घेतलेले स्वातंत्र्य सेनानी स्व। चंद्रशेखर दादा बाजपाई यांच्या स्मरणार्थ व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने येत्या 17 सप्टेंबर रोजी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी एस. एम. आर. स्विमिंग पूल येथे एकेरी व दुहेरी अशा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .ही स्पर्धा 19 वर्षे वयोगटाच्या वयोगटापर्यंत तसेच 11, 13 ,15 , 17 या वयोगटासाठी असेल. एकेरी व दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देशमुख यांनी केले आहे.

या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांना एकूण 51 हजार रुपयांची रोख पारितोषिक व प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत .या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गौरव मानके (9403499234 या नंबरची संपर्क करावा ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे .
15 सप्टेंबर ही प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख असून एकेरी व दुहेरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 300 रुपये आणि दुहेरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये असे शुल्क ठेवण्यात आलेले आहे .या या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे ,असे आवाहन लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देशमुख ,सचिव अँड. आशिष बाजपाई ,अभयकुमार शाह, रवी शेट्टी ,मनीष राठी ,आशिष सोमाणी,वाघमारे गुरुजी यांनी केले आहे.