माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन.
लातूर :– रेणापुरकरांचे कष्टाचे मोल जाणून हक्काचा त्यांच्या हक्काचा एक कारखाना असावा या भावनेतून लोकनेते विलासराव देशमुख यांनी रेणा साखर कारखान्याची उभारणी केली.व त्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला. असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी केले.
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाच्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्रिंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीपतराव काकडे,राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,रणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे,संत शिरोमणीचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय साळुंके,संचालिका स्वयंप्रभा पाटील,अनिता केंद्रे विलासचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे,लालासाहेब चव्हाण,रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, मांजराचे जितेंद्र रणवरे, विलासचे संजीव देसाई, ट्वेंटीवन शुगरचे समीर सलगर, जिल्हा बँकेचे एच जे जाधव, विलास २ चे ए आर पवार, संत शिरोमणीचे रविशंकर बरामदे, जागृतीचे गणेश येवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना दिलीपरावजी देशमुख म्हणाले की,आपला भाग हा कमी रिकव्हरीचा म्हणून ओळखला जात होता. तरी देखील येथील शेतकऱ्यांनी दर्जेदार उसाचे उत्पादन घेऊन चांगला ऊस पिकवला.त्या पिकवलेल्या उसाचे वेळेत गळप करून सर्वाधिक भाव मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी दिला आहे. भविष्यात मांजरा परिवार सर्व साखर कारखान्यांचे विस्तारीकरण करून शेतकऱ्यांना आधार देणार आहे. साखर कारखाने चालवत असताना देश व जगाच्या पातळीवर साखर उद्योगात काय बदल होत आहेत. यावर लक्ष ठेवून काम केले जाते. जागतिक स्तरावर आता इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात असताना आपले कारखाने देखील मागे राहता कामा नयेत यासाठी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस सुरुवात केली आहे. काळाची गरज ओळखून ऊसतोड यंत्राची सुरुवात केली व यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले. मागील हंगामात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळला असल्याचे सांगून रेणा च्या कर्मचाऱ्यांना १०% बोनस व प्रतिसभासद ५० किलो साखर रुपय २५ प्रती किलो या सवलतीच्या दराने देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
ऊस तोडणी यंत्रासाठी शासनाने अनुदान द्यावे. आमदार धिरज विलासराव देशमुख यांची मागणी.
काळाची गरज ओळखून अनेक शेतकरी ऊसतोड यंत्र खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लातूर जिल्हा बँक कर्ज देण्यासाठी पुढे आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील आहे. ऊस तोडणी यंत्रा मुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. अशा परस्थितीत ऊस तोडणी यंत्रासाठी शासनाने कमीत कमी २५ लाख रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी केली आहे.
रेणा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखाना परिवारातील साखर कारखान्यांनी पश्चिम महाराष्ट्राला देखील मागे टाकून साखर उद्योगात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता आपली स्पर्धा ही जगाशी असून या स्पर्धेत देखील आपले साखर कारखाने यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सर्व विषयांचे वाचन कार्यकारी संचालक बीव्ही मोरे यांनी केले त्यास अनुबोधन देऊन चेअरमन सर्जेराव मोरे यांनी प्रास्ताविकात रेणा कारखान्याच्या वाटचालीचा आढावा सभेपुढे सादर केला. सर्व साधारण सभेपुढील सर्व विषयांना टाळ्याच्या गजरात सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील व अभय साळुंखे यांची समायोजित भाषणे झाली.यावेळी सहकार नेतृत्व पुरस्कार पुरस्कार मिळाल्या बद्दल दिलीपरावजी देशमुख साहेबांचा रेणापूर तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी सत्कार केला
यावेळी सर्वाधिक ऊस पुरवठा दारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेस कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, प्रेमनाथ अकणगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजी हाके, तानाजी कांबळे, संजय हरिदास, वैशाली माने, अमृता देशमुख, अनिल कुटवाड, सतीश पाटील यांच्यासह शेतकरी सभासदांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रविण पाटील यांनी मानले.
—