विश्वशांती केंद्र, माईर्स पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिेषद यांच्या संयुक्त विद्यमाने
१४ मार्च रोजी राष्ट्रधर्म पूजक-दादाराव कराड स्मृती
लातूर दि. ०८ : – विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे ‘राष्ट्रधर्म पूजक-दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-२०२३’ मंगळवार, दि. १४ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आली असून सर्वक्षेष्ठ विजेत्या मल्लास रोख रु. १ लाख रूपये आणि सन्मानचिन्ह, चांदीची गदा देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कुस्ती खेळाडूसह क्रिडाप्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व लातूर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.

या कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि.१४ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजता होणार असून पारितोषिक वितरण समारंभ सायं. ७ वा. होणार आहे. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या समारंभास केंद्रीय उर्जा संसाधन माजी मंत्री मा. श्री. बबनराव ढाकणे यांच्यासह हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते पै. शांताराम जाधव, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १५ वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील नामवंतासह देशभरातील नामवंत मल्लांना निमंत्रीत केले असून या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील सर्वक्षेष्ठ विजेत्या मल्लास ‘महाराष्ट्र कुस्ती महा-वीर’ हा अत्यंत बहुमानाचा किताब, सन्मानचिन्ह, चांदीची गदा व रोख रु. १ लाख रूपये देण्यात येणार आहे. तर द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय ५० हजार रुपये यासह वजनगट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६ आणि खुला गट ८६ ते १२५ किलो वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय हजारो रुपयांची पारितोषिके आणि महावस्त्र, ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा, सुवर्ण/ रौप्य/ कास्यं पदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व कुस्तीगीरांना मानधन देण्यात येईल.

थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्य शास्त्रातील एक महान चमत्कार, योगमहर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा पंच्चाहत्तर (७५) वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योगमहर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण / रौप्य/ कांस्य गौरवपदक बहाल करण्यात येईल.
सर्व मल्लांची वजने मंगळवार, दि. १३ मार्च २०२३ रोजी सायं. ४ ते ८ पर्यंत घेतली जातील. सर्व कुस्तीगीरांनी आधारकार्डची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे. स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात येणार असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसाठी येणार्या निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या-येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल.

या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे, त्याचबरोबर क्रिडाप्रेमींनी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी श्री. काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राहुल वि. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण समुह व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, माईर्स एमआयटी कार्यकारी संचालक श्री. राजेश कराड, महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा संयोजन समिती सचिव श्री. विलास कथुरे यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.
