24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा

राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा

विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिेषद यांच्या संयुक्त विद्यमाने

येत्‍या ११ मे रोजी राष्ट्रधर्म पूजक-दादाराव कराड स्मृती

“राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- २०२२”

लातूर, दि. ०४  : विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य  कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर येथे ‘राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-२०२२’ बुधवार, दि. ११ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला प्रोत्साहन देणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या बलोपासनेच्या धोरणाला अनुसरुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे.


–           स्पर्धेचा उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ –
या स्पर्धेचा  बुधवार, दि.११ मे २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून सायं. ७.०० वा. पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.या समारंभासाठी महाराष्ट्राचे संसदीय कार्य, राज्य मंत्री ना. श्री.संजय बनसोडे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, पुणेचे सरचिटणीस  श्री.बाळासाहेब लांडगे, हिंद केसरी मा.श्री.दिनानाथ सिंग, हिंद केसरी रोहीत पटेल, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलहे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष  प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.  

या स्पर्धेसाठी भारतातील व विशेष करून महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना निमंत्रित केले असून स्पर्धेतील विजेत्या मल्लांना महावस्त्र, ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रतिमा, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ अशा कुस्तीगीराला ‘महाराष्ट्र कुस्ती महा-वीर’हा अत्यंत बहुमानाचा किताब, सन्मानचिन्ह, चांदीची गदा व रोख रु. ७१,०००/- देण्यात येतील.
आजपर्यंत पै. सचिन खुर्द, पै. नंदकुमार आबदार, पै. प्रविण शेवाळे, पै. ज्ञानेश्‍वर गोचडे, पै. महेश वरूटे, पै. बापु कोळेकर, पै. दिपक कराड, पै. सुनिल शेवतकर, पै. सिकंदर शेख या नामवंत मल्लांनी ‘ महाराष्ट्र कुस्ती महा-वीर’  हा अत्यंत बहुमानाचा किताब पटकाविलेला आहे.  तसेच विविध वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय भरीव स्वरुपाची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल.
या स्पर्धेचे वजन गट व बक्षिसे पुढीलप्रमाणे – (प्रथम क्रमांक – सुवर्णपदक,  द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक व रोख रक्कम पुढे दिल्याप्रमाणे)
—————————————————
वजन गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक   तृतीय क्रमांक चतुर्थ  क्रमांक
—————————————————
८६ ते १२५ कि. रु. ७१,०००/- रु. ५१,०००/- रु. ३१,०००/- रु.२१,०००/-
(खुला गट)
८६ किलो रु. ३०,०००/- रु. २५,०००/- रु. २०,०००/- रु. १५,०००/-
७४ किलो रु. २५,०००/- रु. २०,०००/- रु. १५,०००/- रु. १०,०००/-
७० किलो रु. १५,०००/- रु. १०,०००/- रु. ७,०००/- रु. ४,०००/-
६५ किलो रु. १०,०००/- रु. ८,०००/- रु. ५,०००/- रु. ३,०००/-
६१ किलो रु. ८,०००/- रु. ५,०००/- रु.३,०००/- रु. २,०००/-
५७ किलो रु. ५,०००/- रु. ३,०००/- रु. २,०००/- रु.१,५००/-

क्वार्टर फायनल (उपांत्यपूर्व) फेरीमध्ये पोहोचलेल्या ५७, ६१ व ६५ किलोवजन गटातील सर्व कुस्तीगीरांना रु. १,०००/- तसेच, ७०, ७४ व ८६ किलो वजनगटातील सर्व कुस्तीगीरांना रु. २,०००/- व खुल्या गटातील सर्व कुस्तीगीरांना रु.३,०००/- मानधन देण्यात येईल.
  राष्ट्रधर्म पूजक, प्रखर देशभक्त वै. दादाराव साधू कराड यांचा लातूर जिल्ह्यातील रामेश्‍वर (रुई) या खेडयातील एका वारकरी कुटुंबात जन्म झाला. तरुणपणापासून त्यांना जाज्वल्य देशाभिमानाने भारुन टाकले होते. कमावलेले शरीर, ईश्‍वर व देशनिष्ठा, अपार कष्ट करण्याची तयारी व प्रभावी व्यक्तिमत्व या जोरावर त्यांनी आपल्या खेडयातील जनतेला व विशेषत: तरुणांना परकीय सत्ते विरुद्ध लढा देण्यास प्रोत्साहित केले. केवळ एवढेच नव्हे, तर मजबूत समाज बांधणीसाठी, धर्माधर्मातील, जाती-जातीतील व विशेष करुन रझाकारांच्या काळात हिंदू-मुस्लिम समाजातील भेद दूर करुन एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील रयतेला जागृत केले. अशा या लोकविलक्षण विभूतीच्या स्मरणार्थ शरीरसौष्ठव व आरोग्यासाठी प्रेरित करणारी राज्य पातळीवरील महाराष्ट्र कुस्ती महा-वीर ही नाविन्यपूर्ण स्पर्धा भरविण्यात येतआहे.
योगमहर्षि शतायुषी वै.शेलारमामा यांच्या नावाने विशेष कुस्त्या
थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्यशास्त्रातील एक महान चमत्कार, योगमहर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा पंच्चाहत्तर (७५) वर्षे वयाच्यापुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा  आयोजित  करण्यात आली आहे. विजेत्यांना योगमहर्षि वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण /रौप्य/कांस्य गौरवपदक बहाल करण्यात येईल.
  सर्व मल्लांची वजने मंगळवार, दि. १० मे २०२२ रोजी सायं.४ ते ८ पर्यंत घेतली जातील. सर्व कुस्तीगीरांनी वजन घेते वेळी आधारकार्डची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.  
  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा. विलास कथुरे (मो.नं.९८५०२११४०४) व प्रा.डॉ. पी.जी. धनवे मो.नं. ९८२२६२६००६  यांच्याशी संपर्क साधावा.
वरील स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात येतील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही. यामध्ये जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
       स्पर्धेसाठी येणार्‍या जिल्हा कुस्तीगीर संघातील मान्य निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या-येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल.
अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्‍वस्त राहुल विश्‍वनाथ कराड व  एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशअप्पा कराड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]