16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय*रस्ते, नाल्या व रस्ते दुभाजकाच्या दुरुस्तीचा शुभारंभ*

*रस्ते, नाल्या व रस्ते दुभाजकाच्या दुरुस्तीचा शुभारंभ*

शिवाजी चौक ते उदयगिरी महाविद्यालयापर्यंतच्या रस्ते,नाल्या व रस्ते दुभाजकाच्या दुरुस्तीचा

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्ह्यातील रस्ते विकासाला प्राधान्य;

रस्ते विकासाचे काम येत्या 12 महिन्यात पूर्ण होणार

–राज्यमंत्री संजय बनसोडे

*लातूर,दि.17(जिमाका):-* जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अहमदपूर-शिरुर ताजबंद-उदगीर राज्य मार्ग क्र. 249 कि.231/600 ते 233/00 या कामाचा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मजबुतीकरण करणे, रस्त्याच्या मधोमध 1.50 रुंदीचे सिमेंट क्राँन्क्रीटमध्ये रस्ता दुभाजक बांधणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूस सिंमेट क्राँन्क्रीटमध्ये 1.50 मीटर रुंदीचे नालीचे बांधकाम करणे, दुभाजकाच्या दोन्ही बाजूस 7.00 मीटर रुंदीचा सिमेंट क्राँन्क्रीट रस्ता करणे. सिमेंट क्राँन्क्रीट रस्त्यापासून दोन्ही बाजूस 4.50 मीटर रुंदीचा डांबरी पृष्ठभागाचा सेवा रस्ता ( सर्व्हीस रोड) करणे. इत्यादी बाबीचा समावेश सदरील कामाच्या अंदाजपत्रकात करण्यात ओलेला आहे. सदरील कामाचा काम पूर्ण करण्याचा कालावधी 12 महिने असून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणार आहे, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अहमदपूर-शिरुर ताजबंद-उदगीर राज्य मार्ग क्र. 249 कि.231/600 ते 233/00 रस्त्यांची विशेष दुरुस्तीचा शुभारंभ राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन अत्याधुनिक पध्दतीने पेव्हर मशिनद्वारे करण्यात येणार आहे.  या कामास प्रशासकीय मान्यता 1500 लक्ष रुपयांची असून तर तांत्रिक मान्यता ही 1325.93 लक्ष रुपयांची आहे. तसेच याची निविदा रक्कम 1325.93 लक्ष आहे. 

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर-शिरुर ताजबंद-उदगीर हा रस्ता मार्ग क्र. 249 असून अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. हा राज्यमार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना या चार राज्यांना जोडणारा रस्ता असून अत्यंत वाहतूक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याची उदगीर तालुक्यातील लांबी 27 कि.मी. असून त्यापैकी साखळी क्र. 230/0 ते 233/0 ही लांबी उदगीर शहरातील आहे. या रस्त्याला संलग्न राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 असून तो रस्ताही उदगीर शहरातून बीदरकडे जातो. कि.मी. 231/600 ते 233/00 उमा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ही रस्त्याची लांबी विशेष दुरुस्ती अंतर्गत मंजूर आहे.

यावेळी  श्री.बसवराज पाटील नागराळकर, श्री.समीर शेख,श्री.ताहेर हुसेन, श्री.शाम डावळे, उपविभागीय अधिकारी, श्री.प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार, श्री.रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी, श्री.शुभम क्यातमवार ,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे कार्यकारी अभियंता, श्री दराडे,  इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]