पद्मश्री मोहम्मद रफी यांना अभिवादन..!
अहमदपूर दि.31हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज शहरातील पद्मश्री मोहम्मद रफी मार्ग या नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
साहित्य संगीत कला अकादमी (महाराष्ट्र) अहमदपूर जि.लातूर च्या च्या वतीने अभिवादन कार्यक्रमातचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष तथा युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून नगरसेवक डाॅ.फूजैल जागीरदार,नगरसेवक सय्यद मून्नाभाई,व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष ओमभाऊ पूण्णे,निराधार योजनेचे माजी संचालक आसीफखान पठाण,रिपाइचे तालूकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर,मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक शेख अय्याजभाई,अजीज काझी,यूवा कार्यकर्ते महेंद्र ससाणे,अंनिस कार्यकर्ते मेघराज गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत मोहम्मद रफी साहेबांच्या जीवनावर आधारीत मनोगते व्यक्त करून पुढील काळात शहरामध्ये खूप मोठ्या व्यापक स्वरूपात रफी यांच्या आठवणी प्रित्यर्थ उपक्रमाचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने आयोजीत विविध उपक्रमाची माहिती देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने हा कार्यक्रम घेत असून पूढील काळात आतिशय दर्जेदार स्वरूपात मोहम्मद रफी साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद याखूबभाई यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी विस्तार अधिकारी एन.डी.राठोड यांनी मानले.यावेळेस अजय भालेराव, राहुल सूर्यवंशी,हाकीमभाई पिंजारी,सय्यद अजगर, चंद्रकांत कांबळे,राहूल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.