लातूर :
औसा येथील सेवानिवृत्त केंद्रीय मुख्याध्यापक, सेवाव्रती समाजसेवक आणि शिक्षक ते केंद्रीय मुख्याध्यापक हा संपूर्ण शैक्षणिक प्रवास सायकलवर केलेले ध्येयनिष्ठ विद्यार्थीप्रिय शिक्षक मोतीचंद व्यंकोबा दुरुगकर यांना सोलापूरच्या दिगंबर जैन कासार प्रतिष्ठानचा ‘ जीवन गौरव पुरस्कार ‘ नुकताच जाहीर झाला आहे. सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही ते सक्रीय आहेत. वयाचे 91 वर्षांचे उंबरठे ओलांडलेले मोतीचंदजी औसा तालुक्यात ‘कासार गुरुजी ‘ नावाने ओळखले जातात. अंशाच्या जैन मंदिर देवस्थानचे ते विश्वस्तही आहेत.
येत्या 28 ऑगस्ट ( रविवारी ) सोलापूर येथील डाॅ. निर्मलग्राम फडकुले सभागृहात जागतिकवख्यातीचे प्लॅस्टिक सर्जन डाॅ. विठ्ठल लहाने यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात कासार गुरुजींना या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ही माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल नळे यांनी दिली.
…………………………………