◆हिरे व रत्नांच्या किंमतीवर ३० टक्के सूट◆
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२२: मेलोरा हा किफायतशीर दरांमध्ये ट्रेण्डी, वजनाने हलके, बीआयएस हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांमध्ये विशेषीकृत असलेला भारतातील झपाट्याने विकसित होणारा डी२सी ब्रॅण्ड आजपासून त्याचा ६-दिवसीय ब्लॅक फ्रायडे डे सुरू करत आहे. मेलोराचा ब्लॅक फ्रायडे सेल सर्व हिरे व रत्नांच्या किंमतींवर फ्लॅट ३० टक्के सूट आणि घडणावळवर जवळपास १०० टक्के सूट देत आहे. ग्राहकांना आयसीआयसीआय बँक किंवा बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड वापरावर किंमतींमध्ये अतिरिक्त १० टक्के सूट देखील मिळू शकेल.
ग्राहक ऑनलाइन, तसेच देशभरातील त्यांच्या एक्स्पेरिअन्स सेंटर्सच्या माध्यमातून या सेलचा लाभ घेऊ शकतात. मेलोराने स्वतःला भारतातील सर्वोत्कृष्ट, दररोजच्या ज्वेलरी ब्रॅण्डपैकी एक म्हणून स्थापित केले आहे, जो भारत, यूएई, यूएसए, यूके व युरोपमध्ये २६,००० हून अधिक ठिकाणी कार्यरत असून त्यामध्ये वाढ होत आहे.
मेलोराच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्ली म्हणाल्या, “ब्लॅक फ्रायडे पारंपारिकपणे ख्रिसमसच्या खरेदी हंगामाच्या शुभारंभाशी संलग्न आहे. स्टायलिश, दैनंदिन दागिन्यांची विस्तृत श्रेणी आता उपलब्ध आहे आणि ऑनलाइन खरेदी देशात उपलब्ध असलेल्या विस्तृत श्रेणीत आणखी भर घालत आहे. आमच्या डिझाइन्स जागतिक फॅशन ट्रेण्डने प्रेरित आहेत आणि प्रत्येक प्रसंगासाठी अगदी योग्य पर्याय आहेत, मग ते सणासुदीचे असोत किंवा दैनंदिन वेअर असोत.”
मेलोरा आधुनिक काळातील महिलांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करणारे दागिने डिझाइन करते. ब्रॅण्डची इतर खासियत म्हणजे परवडणारी किंमत, ३०-दिवसांची रिटर्न पॉलिसी आणि अगदी मॉड्युलर डिझाइन्स. या सर्वांमुळे ब्रॅण्डने द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये देखील आपली उपस्थिती निर्माण केली आहे.