29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeदेश विदेश*मुर्मूंना ६४ टक्के तर यशवंत सिन्हां यांना ३५ टक्के मतं*

*मुर्मूंना ६४ टक्के तर यशवंत सिन्हां यांना ३५ टक्के मतं*

द्रौपदी मुर्मूंना तीन राज्यात १०० टक्के मतं तर सिन्हांना ८राज्यात आघाडी

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यानं विजयी झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा २५ जुलै रोजी राष्ट्रपती म्हणून शपथविधी होईल. द्रौपदी मुर्मू यांच्या निमित्तानं पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतीपदावर विराजमान होणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांना देशातील राज्यांमध्ये सर्व मतं मिळाली. आंध्र प्रदेश, नागालँड आणि सिक्कीम मध्ये यशवंत सिन्हा यांना एकही मतं मिळालं नाही.

एकूण मतदार किती, कुणाला किती मतं मिळाली?

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशातील सर्व घटक राज्यातील विधिमंडळाचे आमदार, संसदेतील लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार, नवी दिल्ली आणि पाँडिचेरी या केंद्र शासीत प्रदेशातील आमदार मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदारांची संख्या ४०३३ आमदार आणि ७७६ खासदार मतदान करु शकतात. त्यापैकी ७६३ खासदारांनी आणि ३९९१ खासदारांनी मतदान केलं. यापैकी ५३ जणांची मतं बाद झाली, यामध्ये १५ खासदार आणि ३८ आमदारांची मतं बाद ठरली.

द्रौपदी मुर्मू यांना आमदार आणि खासदार मिळून २८२४ मतं मिळाली. या मतांचं मूल्य ६ लाख ७६ हजार ८०३ इतकं होतं. तर, यशवंत सिन्हा यांना आमदार आणि खासदारांची १८७७ मतं मिळाली. या मतांचं मूल्य ३ लाख ८० हजार १७७ इतकं होतं. मतांच्या मूल्याची तुलना केल्यास मुर्मूंना ६४ टक्के तर सिन्हा यांना ३६ टक्के मतं मिळाली.

द्रौपदी मुर्मू यांना ५४० खासदारांची मतं मिळाली. तर, यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांनी मतदान केलं. तर, १५ खासदारांची मतं बाद झाली.

८ राज्यांमध्ये सिन्हा आघाडीवर
——————————————-/
छत्तीसगड, केरळ, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाणा, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्ली या ८ भाजप सत्तेत नसलेल्या राज्यात यशवंत सिन्हांना मुर्मू यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली.

३ राज्यांमध्ये १०० टक्के

द्रौपदी मुर्मू यांना आंध्र प्रदेश, नागालँड आणि सिक्कीम या तीन राज्यात शंभर टक्के मतं मिळाली तर, केरळमध्ये अवघे एक तर तेंलगाणामध्ये केवळ ३ मतं मिळाली.

१२६ आमदार, १७ खासदारांची मत फुटली

१८ राज्यातील आमदार खासदारांची फुटली आहेत. यामध्ये १२६ आमदार आणि १७ खासदारांचा समावेश आहे. आसाममध्ये सर्वाधिक २२ आमदारांची मतं फुटली. मध्य प्रदेशमध्ये १९ आणि गुजरातमध्ये १० जणांनी मुर्मूंना मतदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]