लातूर– जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हर घर तिरंगा अभियानांतर्गत माझं लातूर परिवार, प्रादेशिक परिवहन विभाग आणि राधिका ट्रॅव्हल्सच्या वतीने शहरातील हनुमान चौक येथे ५००० तिरंगा ध्वज सर्वसामान्य नागरिकांना मोफत वितरित करण्यात आले.
आज सायंकाळी ५ च्या सुमारास ध्वज वितरणास प्रारंभ झाला याप्रसंगी प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक शितल गोसावी, मनोज लोणारी, बजरंग कोरावले, संजय आडे माझं लातूर परिवाराचे शाम तोष्णीवाल, रविंद्र गट्टाणी, विष्णू अष्टेकर, रत्नाकर निलंगेकर, संजय भिसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अवघ्या एका तासात संपूर्ण ५००० ध्वज नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ध्वज पोहोचला पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संधी सर्वसामान्य गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला लातूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश शिंदे, जुगलकिशोर तोष्णीवाल, रवी अंबुज, युवराज कांबळे, ऍड उमाकांत नाईकनवरे, श्रीराम जाधव यांनी परिश्रम घेतले.