औरंगाबाद ( विशेष प्रतिनिधी)
लातूर चे लोकप्रिय माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्य वत्सला बळीराम प्रकाशन केंद्र यांनी प्रकाशित केलेले “जनसेवक: जमिनीशी नाळ असलेला नेता:प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड” हा ग्रंथ डॉ आंबेडकर लॉ कॉलेज औरंगाबाद चे प्राचार्य डॉ प्रमोद हेरोडे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. सोबत प्राचार्य डॉ निशिकांत आल्टे,मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ प्रमोद हेरोडे म्हणाले की,लातूर चे खासदार म्हणून २०१४ ते २०१९ या कालावधी मधे डॉ गायकवाड खासदार म्हणून काम करताना त्यांनी आपली नाळ समाजाशी जोडलेली आहे.तळागाळातील लोकांना मुख्यप्रवाहात आणण्याचे काम केले आहे.लोकसभेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल डॉ सुनील गायकवाड यांना संसद रत्न पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आणि विशेष म्हणजे लोकसभा कामकाजात त्यांचा १३ वा क्रमांक निघाला होता.या ग्रंथा मधे त्यांच्या मित्रांनी त्यांच्या बद्दल च्या भावना व्यक्त केल्या आहेत. यातून माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या स्वभावाबद्दल काही प्रमाणात माहिती जनतेला या ग्रंथातून मिळणार आहे.
प्राचार्य डॉ निशिकांत आल्टे म्हणाले की खासदार सुनील बळीराम गायकवाड हे खासदार होण्यापूर्वी आणि खासदार झाल्यानंतर ही कसलाच बदल स्वतःच्या स्वभावात झाला नाही ते सदैव जमिनीशी नाळ आसलेला नेता राहिले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.एक अतिउच्चशिक्षित खासदार म्हणून हाई रेंज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मधे नोंद झालेले लोकप्रतिनिधी त्यांचा आम्हाला अभिमानच आहे असे गौरव उद्दगार काढले.
डॉ आंबेडकर लॉ कॉलेज मधे हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला अनेकजण उपस्थित होते.