16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्या*महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी*

*महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी*

निलंगा तालुक्यातील निटूर येथील ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात महाशिवराञीनिमित्त दर्शनासाठी भाविक-भक्तांची मांदियाळी..

निलंगा-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील पंचक्रोशीतील जाज्वल्य जागृृत ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात महाशिवराञीनिमित्त दर्शनासाठी भाविक-भक्तांची मांदियाळी पहाटेपासून दिसत होती.तसेच अनेक भाविक-भक्तांनी ग्रामदैवतास अभिषेक सपत्निक केले.
ग्रामदैवतामध्ये महाशिवराञीनिमित्ताने अनेक भाविक-भक्तांची दर्शनासाठी मांदियाळी पहावयास मिळाली पहाटेपासून मंदिरात सपत्निक अभिषेक करण्यासाठी लातूर व अन्य जिल्ह्यातून याठिकाणी दर्शनासाठी रांग लागली होती.तसेच महाशिवराञीनिमित्ताने अनेक भक्तांना महाप्रसादरूपी फराळ,चहा,केळी,द्राक्ष भाविक-भक्तांना देण्यात आले.अनेक भाविक-भक्त हे दर्शनासाठी पहाटेचं पायी चालत दर्शन घेतात हे विशेष आहे.
मंदिराचे रूपडे बदलल्याने याठिकाणी सुशोभिकरणाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातून आणि अन्य राज्यातून याठिकाणी भाविक-भक्त हे दर्शनासाठी येतात.मंदिर हे उंच टेकडीवर वास्तव्य असल्याने रमणीय मंदिर म्हणून परिचित आहे.तसेच याठिकाणी भाविक-भक्तांची दर्शनासाठी आवक-जावक वाढल्याने भाविक-भक्तांसाठी जागृृृत देवस्थान म्हणून परिचित आहे.
मंदिरात महाशिवराञीनिमित्ताने राञी प्रा.स्मिता आजेगावकर यांचे नारदीय सुश्राव्य कीर्तनसेवेच्या माध्यमातून त्यांनी भाविक-भक्तांसमोर खर्‍याचा विजय होतचं असतो त्यामुळे संयम ठेवला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.निटूर व परिसरातील असंख्य भाविक-भक्तांच्या उपस्थित हा नारदीय सुश्राव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी विश्वस्त समितीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]