निटूर येथील वेताळेश्वर परिसरातील डी.पी.चा फ्युॅज सतत जात असल्याने पाणीटंचाईत वाढ..!
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
निलंगा तालुक्यातील निटूर येथील वेताळेश्वर परिसरातील डी.पी.चा फ्युॅज सतत जात असल्याने पाणीटंचाईवर मोठा परिणाम होत आहे.याकडे,संबंधिताच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
निटूर येथील वेताळेश्वर परिसरातील वीज महावितरण उपकेंद्र 33/11 के.व्ही.अंतर्गत विजपूरवठा करण्यात येतो.निटूर येथे सकाळी साठेआठ ते साठे नऊ दरम्यान, सार्वजनिक टाकीतून घरगुत्ती नळाला पाणी सोडण्यात आले माञ,यापरिसरातील विजगुळ झाल्याने सर्वसामान्य जनतेची पाण्यासाठी टंचाईत वाढ झाली आहे.तसेच,सार्वजनिक टाकीव्दारे पाणी सोडण्यात आले होते.माञ,कांही भागात विज असल्याने अनेक जणांनी मोटरीव्दारे पाणी भरले जाते.
प्रभाग दोनमधील कोळ्ळी गल्लीला अद्यापही पाणी मिळाले नाही.म्हणून उन्हाळ्याच्या चाहुलीत भर उन्हात सर्वसामान्य जनता पाण्यासाठी खांद्याचा आणि सायकलव्दारे पाणी आणण्यात व्यस्त होते.असा दुजाभाव का ? असा संतप्त सवाल याप्रभागातील जनताजनार्धन करित आहे.
एकंदर,नळाला पाणी सोडण्यात आले.माञ,पाणी ज्या भागात विज होती तेथेच पाणी गेल्याने असे प्रकार अनेकदा झाल्याने याप्रभागातील जनता,महिलावर्ग विज महावितरणचा ढिसाळ कारभार चालल्याने याकडे,वरिष्ढांनी तात्काळ लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.