16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय*महायुतीच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद*

*महायुतीच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद*

देशहितासाठी महायुती गावपातळीवर मजबुत करावी

ना. संजय बनसोडे यांचे आवाहन;

जिल्हास्तरीय महायुतीच्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद

लातूर दि.१४ – सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या सुत्रानूसार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सर्व जाती धर्मांना सोबत घेवून काम करत आहेत. देशाचे हित नरेंद्रजी मोदी यांच्याच नेतृत्वात असून केंद्राप्रमाणे महाराष्ट्रही विकास कामात पुढे घेवून जाण्यासाठी महायुती निर्माण झाली असून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यासह तालुका आणि  गावपातळीवर बुथ स्तरावर महायुती मजबुत करावी असे अवाहन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी जिल्हास्तरीय महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. 

लातूर जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. (आठवले गट) यांच्यासह सहयोगी सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय महायुतीचा मेळावा क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थित लातूर येथिल गिरवलकर मंगल कार्यालयात रविवारी दुपारी झाला. या मेळाव्यास भाजपा समन्वय प्रमुख आ. रमेशअप्पा कराड,  राष्ट्रवादी काँग्रेस समन्वय प्रमुख आ. बाबासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख अ‍ॅड. बळवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, आर.पी.आय. आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, माजी आमदार सुधाकर भालेराव, बब्रुवान खंदाडे, गोविंदआण्णा केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रा. प्रेरणा होनराव, लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे, भाजपाचे शैलेश लाहोटी, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, गुरुनाथ मगे, सौ. उत्तरा कलबुर्गे, सौ. रागिणी यादव, सौ. जयश्री पाटील, सौ. मिनाक्षी पाटील, सौ. मिनाताई भोसले, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, संजय दोरवे, बापुराव राठोड, तुकाराम गोरे, अमोल निडवदे, विक्रम शिंदे, अमोल पाटील, दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, गणेश गोमसाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मकरंद सावे, पंडितराव धुमाळ, बबन भोसले, मुर्तुजा खान, प्रशांत पाटील, भरत चामले, सौ. मिनाक्षी शिंगडे, जावेद शेख, शिवसेनेचे गोपाळ माने, सतिष देशमुख, गणेश पांचाळ, सुधीर पाटील, विकास जाधव, सौ. मोहिनी सुर्यवंशी यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. यासह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात महायुतीतील कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. फिर एक बार मोदी सरकार, महायुतीचा विजय असो, प्रभुरामचंद्र की जय अशा गगनभेदी घोषणा देवून कार्यकर्त्यांनी सभागृह दणानूण सोडले होते. 

देशभर सर्वांगीन विकासाचा डोंगर उभा करणार्‍या नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेकडे जात आहे. त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अजितदादा पवार साहेबांनी गुजरात प्रमाणे महाराष्ट्र राज्यही विकास कामात पुढे घेवून जाण्यासाठी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून ना. संजय बनसोडे म्हणाले की, मागील सरकारच्या काळात मी राज्यमंत्री म्हणून काम केले. कोरोनाचा काळ असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर आले नाहीत मात्र उपमुख्यमंत्री अजितदादांनी रात्रंदिवस काम करुन जनतेला मदत केली हा माझा अनुभव आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यातला कार्यकर्ता आजही जागा असल्याने त्यांच्या कामाचा मोठा धडाका सुरु आहे. 

मराठवाडा पाणीदार व्हावा, दुष्काळमुक्त व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉटरग्रीड योजना मंजूर केली होती मात्र ही योजना ठाकरे सरकारने बंद पाडली मराठवाड्याच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मिळून पुन्हा या योजनेला मान्यता दिली असल्यासे सांगून ना. संजय बनसोडे म्हणाले की, केंद्रातील आणि राज्यातील महायुतीच्या शासनाने अनेक विकासाची कामे केली असून विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. देश हितासाठी आणि देशाच्या सर्वांगीन विकासासाठी पुन्हा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होणे काळाची गरज असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात होणार्‍या निवडणुकीसाठी एक दिलाने, एक ताकतीने महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडूण आणण्यासाठी मेहनत घ्यावी आणि गावपातळीवर, बुथ स्तरावर महायुती मजबुत करावी. त्याच बरोबर येत्या २२ जानेवारी रोजी जगाने दखल घ्यावी अशा भव्य मंदिरात रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने प्रत्येकांनी त्या दिवशी दिवाळी साजरी करावी असे अवाहन केले. 

या मेळाव्यात बोलताना भाजपा समन्वय प्रमुख आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ नरेंद्र मोदी यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाने सर्वांगीन विकासाची उंची गाठली असून सार्वजनिक विकास कामाबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना मिळाला. राज्यात मागील काळात धोका देवून अभद्र आघाडी झाली होती. मर्द मावळा एकनाथ शिंदे यांनी अभद्र आघाडीतून बाहेर पडून जनतेच्या हितासाठी युतीत सहभागी झाले. भाजपा खुर्चीपेक्षा तत्वाला महत्व देते. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका, अजितदादांचे धाडसी निर्णय आणि देवेंद्रभाऊंच्या चाणक्य नितीने महाराष्ट्रात महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाला मोठी गती मिळाली आहे. महायुतीत भाजपा मोठ्या भावाच्या भुमिकेत आहे. महायुतीतील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मजबुत फळी असून सर्वांनी गावपातळीवर एकत्रितपणे काम करुन लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.   

लोकसभेची निवडणुक देशाला दिशा देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण दिले, शेतीला प्राधान्य दिले, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलले, तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. मोदीजींच्या योग दिनाचा जगाने आदर्श घेतला असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वय प्रमुख आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वत: उमेदवार समजून प्रत्येकांनी काम करावे. हा देश काम करणार्‍या पाठिशी आहे केवळ बोलणार्‍याच्या पाठिशी नाही हे दाखवून द्यावे असे बोलून दाखविले. 

शिवसेना जिल्हा प्रमुख अ‍ॅड. बळवंत जाधव यावेळी बोलताना म्हणाले की, देशाचे भवितव्य सुरक्षित रहावे यासाठी देशाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याच नेतृत्वाची गरज आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने मुस्लिमांना कधीच हिंदुस्थानी होवू दिले नाही. विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेतले नाही. मोदीजी यांनीच सर्व जाती धर्मांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेतले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना एकत्र लढून जिंकले असताना रातोरात शिवसेना विकल्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसैनिकांच्या पाठीत खंजिर खुपसन्याचे कृत्य केले. आनाथांचा नाथ एकनाथ शिंदेच आहेत. त्यांच्याच नेतृत्वाती शिवसैनिक महायुतीच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याशिवाय राहणार नाही. 

या मेळाव्यात आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, आर.पी.आय. चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन महायुतीच्या विजयासाठी एकत्रितपणे काम करावे असे अवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा महिला आघाडीच्या सौ. रागिणी यादव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गुरुनाथ मगे यांनी केले तर शेवटी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप झाला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]