32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeशैक्षणिक*महाब्रॅण्ड आयआयबीच्या महानिकालाचा महासोहळा संपन्न!*

*महाब्रॅण्ड आयआयबीच्या महानिकालाचा महासोहळा संपन्न!*


यावर्षी एम्स आणि एमबीबीएस चा टक्का वाढणार: मुख्यकार्यकारीसंचालक दशरथ पाटील यांची माहिती
गुणवंताच्या पाठीवर टिम आयआयबीची शाबासकीची थाप .. अनेक विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा..


नांदेड – प्रतिनिधी
येथील कॅनाल रोडस्थित चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे आयआयबीच्या नीट-२०२३ गुणवंताचा जल्लोषात सत्कार करण्यात आला मागील तब्बल २४ वर्षांपासून डॉक्टर आणि इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी आणि महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नीट-२०१३ मध्येही दैदिप्यमान निकाल दिला आहे.

यानिमित्ताने या गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक या उदात्त हेतूने नीट-२०२३ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शॉल, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला.
गुणवंताच्या सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर आयआयबीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. आयआयबी करीअर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या नीट- २०२३ परीक्षेच्या निकालात उत्तुंग यशाची झेप घेत नीट मध्ये उत्तुंग यश मिळविले आहे. यामध्ये आयआयबीच्या पलक जाजू, सायली महिंद्रकर आणि पलक शहा या विद्यार्थिनींनी ७२० पैकी ७०५ गुण प्राप्त केले. तसेच आयआयबीच्या शिवम माहूरे ७००, ज्ञानेश्वर जाधव ७००, साक्षी वजिरगावे ७००, अर्जुन लिंगदळे ७००, उझेर रुलानी ६९७, भारती देशमुख ६९६, अनुष्का भारसवाडकर ६९६ या विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश संपादन केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नीट-२०२३ मध्ये घवघवीत यश संपादन करत एमबीबीएस शिक्षणाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे.
तरी या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक या उदात्त हेतूने नीट-२०२३ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शॉल, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, टीम आयआयबी, आयआयबीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पिसीबी मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे आयआयबी इन्स्टिट्यूट…
फिजिक्स विषयात पलक जाजू, उझेर रुलानी, सर्वेश हटकर, रामप्रसाद पाटील, सायली कदम, हाफिज सोहेल या सहा विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत.तर केमिस्ट्री विषयात सायली महिंद्रकर आणि तेजस पोरे यांना १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत. तर बायोलॉजी विषयात पालक शहा, भारती देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय मिसाळ, गणराज नल्लावार आणि शिवानी जाधव या सहा विद्यार्थ्यांनी ३६० पैकी ३६० गुण मिळविले आहेत ही गौरवास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली …



आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे उत्तुंग यश हे फलित – श्री दशरथ पाटील..
नीट-२०२३ मध्ये उज्ज्वल प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत तर घेतलीच त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या यशात टीम आयआयबीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचाही मोलाचा वाटा आहे. तरी आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात आयआयबी पीसीबी टीमचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय आयआयबी इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाचेही काटेकोरपणे केलेल्या नियोजनाचाही या यशात मोलाची भूमिका असल्याने या सन्मान सोहळ्यात टीम आयआयबी व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला सातत्याने मिळणारे यश हे आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे फलित असल्याचे मत आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील..
————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]