जनमातादेवी कडून पूरग्रस्तांना साड्यांची मदत
माळीण दुर्घटनेतसुद्धा जनमाता देवस्थान ट्रस्टने एक हजार साड्यांचे केले होते वाटप
लातूर : लातूर जिल्ह्यातील खुर्दळी (हाळी खुर्द, ता.चाकूर) येथील नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई देवस्थान विश्वस्थ मंडळाच्या वतीने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील महिलांना पाचशे साड्या भेट देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुरग्रस्थानां मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत जनमाता आई देवस्थानाच्या वतीने पाचशे साड्या व ब्लाउज पीस कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्थ महिलांसाठी भेट देण्यात आल्या. हि मदत विश्वस्थ मंडळाचे ज्ञानेश्वर जाधव यांनी रोटरी क्लब ऑफ चाकूर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, सचिव संगमेश्वर जनगावे, क्लब ट्रेनर शैलेश पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे, विकास हाळे, सुरज शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, काँगेसचे सलीम तांबोळी, चाकूर तालुका पत्रकार संघाचे सचिव सतीश गाडेकर, विनोद निला व्यापारी असोशियशन चे नारायण बेजगमवार आदी उपस्थित होते.